महत्वाच्या बातम्या

 स्वीप अंतर्गत कस्तुरचंद पार्कवर मतदार जागराचा होणार जगातील मोठा पाठ


- जिल्हा प्रशासनातर्फे जय्यत तयारी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : स्वीप अंतर्गत मतदार जागृतीसाठी संपूर्ण भारतभर विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहेत. या उपक्रमात नागपुरने आपला अपूर्व ठसा उमटवला असून विविध उपक्रमांच्या माध्यमातून मतदान वाढावे यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. याचाच एक भाग असलेला भव्य उपक्रम ६ एप्रिल रोजी कस्तुरचंद पार्कवर सकाळी ६ वाजतापासून संपन्न होत आहे. नागपूर येथील हजारो मतदार जागरूक नागरिकत्वाचे राज्यघटनेने बहाल केलेले अधिकार व कर्तव्यपालनाचे पाठ एकत्रितरित्या घेतील.

या महाउपक्रमास विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल, महानगरपालिका आयुक्त अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॅा. विपीन इटनकर, विशेष पोलिस महानिरीक्षक छेरिंग दोरजे, सहपोलिस आयुक्त अश्वती दोरजे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, पोलिस अधीक्षक (ग्रामीण) हर्ष पोद्दार यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत.

यासंदर्भात जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर यांनी आज आढावा बैठक घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांना योग्य समन्वय राखून कार्यक्रम यशस्वी करण्याच्या सूचना दिल्या. सकाळी ६ पासून सुरू होणाऱ्या या कार्यक्रमात मतदान जागरासह स्वीप अंतर्गत मतदार जागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या विशेष गीताचे अनावरण केले जाणार आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षण विभाग, क्रीडा विभाग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील विद्यार्थी, सामाजिक न्याय विभाग व इतर शैक्षणिक संस्था परिश्रम घेत आहेत.





  Print






News - Nagpur




Related Photos