महत्वाच्या बातम्या

  गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघात २४ हजार नवमतदार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघात १८ ते १९ वयोगटातील २४ हजार २६ नवमतदारांनी नोंदणी केली आहे यात १३ हजार २६१ पुरुष तर १० हजार ७६४ महिलांचा समावेश आहे.

१२-गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघातील आमगाव , आरमोरी, गडचिरोली, अहेरी, ब्रम्हपुरी आणि चिमुर हे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. या विधानसभा मतदारसंघातील १८ ते १९ वयोगटाच्या नवमतदारांची माहिती पुढीलप्रमाणे आहे. आमगाव -१ हजार ७१५ पुरुष आणि १ हजार ३६५ महिला, एकूण ३ हजार ८०, आरमोरी-१ हजार ८४८ पुरुष आणि १ हजार ५४४ महिला एकूण ३ हजार ३९२, गडचिरोली २ हजार ७८४ पुरुष आणि २ हजार २८७ महिला एकूण ५ हजार ७१, अहेरी- २ हजार १०२ पुरुष आणि १ हजार ५०९ महिला व एक तृतियपंथी असे एकूण ३ हजार ६१२, ब्रम्हपुरी- २ हजार ४५८ पुरुष आणि २ हजार २३ महिला एकूण ४ हजार ४८१, चिमुर- २ हजार ३५४ पुरुष आणि २ हजार ३६ महिला एकूण ४ हजार ३९० मतदारांनी नोंदणी केली आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos