महत्वाच्या बातम्या

 राणूमाता देवस्थान येथील यात्रा महोत्सव २६ एप्रिल ऐवजी ३ मे रोजी आयोजन 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : वर्धा तालुक्यातील रोठा येथील मॉ राणूमाता देवस्थान येथे दरवर्षी तिथी नुसार उत्सव यात्रा महोत्सव २६ एप्रिल रोजी आयोजित करण्यात येते. या यात्रा महोत्सवात महाराष्ट्रातून अंदाजे १५ ते १७ हजार भावीक भक्तांची उपस्थित असते. यावर्षी २६ एप्रिल रोजी लोकसभा निवडणूकीसाठी जिल्ह्यात मतदान असल्यामुळे व आचार संहिता लागू असल्यामुळे २६ एप्रिल रोजीचा यात्रा महोत्सव स्थगित करण्याचा निर्णय मॉ. राणूमाता देवस्थान संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय चौधरी  व इतर सदस्यांनी घेतला आहे.

सदर यात्रा महोत्सव ३ मे रोजी आयोजित करण्यात आली असून याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रियांका पवार, तहसिलदार दत्तात्रय जाधव, संस्थेच्या अध्यक्षांनी केले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos