महत्वाच्या बातम्या

 अशोक नेते यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या : आमदार डॉ. देवराव होळी


- केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत चामोर्शी येथे भव्य जाहीर सभेचे आयोजन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / चामोर्शी : मागील २ टर्म पासून खासदार असलेले, गडचिरोली जिल्ह्याच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणारे भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आरपीआय, पिरीपा, महायुतीचे गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे उमेदवार खासदार अशोक नेते यांना आपण मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे, असे आवाहन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी चामोर्शी येथील भव्य जाहीर सभेला उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन करताना केले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख मार्गदर्शनात चामोर्शी येथे भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला राज्याचे अन्न औषध प्रशासन मंत्री ना. धर्मरावबाबा आत्राम, महायुतीचे उमेदवार खासदार अशोक नेते, भाजपा जिल्हा अध्यक्ष प्रशांत वाघरे, भाजपा नेते माजी आमदार नामदेवराव उसेंडी, लोकसभा विस्तार बाबुराव कोहळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र वासेकर, लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, जिल्ह्याच्या महामंत्री योगिता पिपरे, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम , डॉक्टर चंदा कोडवते, किसान आघाडीचे रमेश भूरसे, जिल्हा अध्यक्ष किसान मोर्चा रमेश बारसागडे, जिल्हा उपाध्यक्ष प्रणय खुणे, अरुण हरडे, ओबीसी आघाडीचे जिल्हा अध्यक्ष अनिल पोहनकर, महामंत्री मधुकरराव भांडेकर, तालुका अध्यक्ष आनंद भांडेकर, जिल्हा सचिव दिलीप चलाख, शहराचे अध्यक्ष सोपान नैताम, युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष अनिल तिडके, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे लीलाधर भरडकर, बंगाली आघाडीचे जिल्हा अध्यक्ष सुरेश शहा, ओबीसी आघाडी जिल्हा महामंत्री भास्कर बुरे यांचेसह भाजपाचे वरिष्ठ पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos