महत्वाच्या बातम्या

 सिंदेवाही : सर्वोदय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मतदार जनजागृतीची शपथ घेऊन काढली रॅली


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : सर्वोदय महाविद्यालय सिंदेवाहीँ येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथिचे औचित्य साधुन मतदान जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला द्वीपप्रचलन व माल्यार्पण करुन करण्यात आली. कार्यक्रमाची प्रस्तावना रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ .लेमदेव नागलवाड़े यांनी केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश डहारे यांनी अध्यक्षीय भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांना मतदानाचे महत्त्व समजावून सांगितले. कार्यक्रमातील मार्गदर्शक प्रा. प्रफुल रणदिवे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची उत्कृष्ट प्रशासन व्यवस्था सांगून शिवकालीन प्रशासन व्यवस्था निर्माण करायचे झाल्यास उत्तम प्रशासक निवडला जाणे महत्त्वाचे आहे. त्याकरिता विद्यार्थ्यांना मतदान करण्यास उत्तेजित केले व गावातील इतर लोकांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करावे असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे सूत्र-संचालन रासेयो कार्यक्रम सहअधिकारी डॉ. रिज़वान शेख यानी केले. तसेच या कार्यक्रमाला प्रा. गभने, प्रा. मेश्राम, प्रा. बोरकर, प्रा. आडे, प्रा. राठोड, प्रा.डॉ. त्रिपदे, प्रा. रूपा, प्रा. चेतना व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी सर्व उपस्थितांनकडून मतदान शपथ वाचन करुन घेतले. या कार्यक्रमानंतर गावामध्ये मतदान जनजागृती रॅली काढून लोकांना मतदान करण्यास जागृत केले.





  Print






News - Chandrapur




Related Photos