गडचिरोलीसह अहेरी मध्ये मतदारांना रॅली, मॅरेथॉन, रांगोळी व चित्रकलेतून दिला मतदान करण्याचा संदेश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
जिल्हयातील मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी स्वीप अंतर्गत आज जिल्हयात  विविध ठिकाणी रॅली, मॅरेथॉन, रांगोळी व चित्रकलेतून संदेश दिला. जिल्हयातील वेगवेगळया ठिकाणी झालेल्या कार्यक्रमांमध्ये तीन हजार अधिकारी, कर्मचारी, नागरीक व शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. गडचिरोली जिल्हयातील मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी व पारदर्शक निवडणूक होण्याकरीता मतदारांना विविध कार्यक्रमातून स्वीप मधून जनजागृती केली जाते. गडचिरोलीमधील शासकीय क्रिडांगणावर सकाळी सात वाजता मतदार रॅली यामध्ये पायदळ, ऑटो रिक्षा व बाईक रॅलीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड, अति.पोलीस निरीक्षक डॉ.मोहित गर्ग यांनी  हिरवी झेंडी दाखविली. 
यावेळी   येथील सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मनुज जिंदाल,   सहाय्यक जिल्हाधिकारी  राहुल गुप्ता अहेरी उपस्थित होते. शहरातील विविध ठिकाणी तीन रॅलीमार्फत मतदार जनजागृती करण्यात आली. यावेळी सकाळी डॉ.मोहित गर्ग यांनी उपसिथतांना मतदानाची शपथ दिली. जिल्हाभरातून आलेल्या प्रथमत: मतदार म्हणून नोंद झालेल्या नवमतदारांचे गुलाब पुष्प देवून यावेळी स्वागतही करण्यात आले.
याचवेळी अहेरीयेथे आलापल्ली येथे जिल्हयाचे निवडणूक आयकॉन कांस्य पदक विजेते ओंकार ओतारी यांच्या उपसिथतीमध्ये रन फॉर वोट मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अहेरी निवडणुक निर्णय अधिकारी लोणारकर, गट विकास अधिकारी महेश डोके उपस्थित होते. युवकांनी यावेळी मोठया संख्येने उपस्थिती दर्शविली. विजेत्यांना यावेळी प्रशस्तिपत्र देवून सन्मानित केले. 
गडचिरोली शहरात रॅलीच्या यशस्वी आयोजनानंतर रांगोळी व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सहभागी महिला, मुली यांनी रांगोळी काढून मतदान करा हा संदेश रांगोळीमधून दिला. चित्रकला स्पर्धेत विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. रंगांच्या सहाय्याने विविध संदेश देवून त्यांनी मतदार जनजागृती केली. यावेळी रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक श्रुती बारापात्रे, द्वीतीय क्रमांक जागृती बारापात्रे, तर तृतीय क्रमांक श्रुती बोरकर यांना मिळाला. चित्रकलेमध्ये  प्रथम क्रमांक लक्ष्मी बानबले, द्वीतीय क्रमांक प्रशांत बनकर, तर तृतीय क्रमांक स्नेहल पोगळे यांना मिळाला. याव्यतिरीक्त दोन्ही प्रकारात दहा-दहा स्पर्धकरंनर उत्तेजनार्थ बक्षिस वितरीत करण्यात आले.
आज झालेल्या मतदान जनजागृतीसाठी शालेय शिक्षक, विविध शासकीय विभागातील अधिकारी कर्मचारी, माविम अंतर्गत असलेल्या बचत गटांच्या महिला, पोलीस विभागातील अधिकारी-कर्मचारी, जिल्हा परिषद अधिकारी-कर्मचारी, क्रिडा विभागाशी संलग्न युवा-युवती, शालेय विद्यार्थी व विद्यार्थीनी, युवा मतदार व नागरीक यांनी सहभाग नोंदविला. या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये स्वीप मधून शिक्षणाधिकारी आर निकम, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसुळ, नोडल अधिकारी सागर पाटिल, स्वीप सदस्य कृष्णा रेड्डी, जनसंपर्क अधिकारी प्रशांत दिवटे, नायब तहसिलदार सुनिल चुडगूलवार काम पाहिले.
कार्यक्रमावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी कल्पना निळ-ठुबे, निवासी उप जिल्हाधिकारी आलुस्कर, जिल्हा आरोग्य अधिकारी शंभरकर, श्री.महेंद्र गणवीर तहसिलदार गडचिरोली तथा सहा.निवडणूक निर्णय अधिकारी, गट विकास अधिकारी सुनिता मरस्कोले, श्री.संजीव ओहोड मुख्याधिकारी नगरपरिषद गडचिरोली, श्री. अमित पुंडे जिल्हा नोडल अधिकारी (PwD Voters) तथा जिल्हा समन्वयक नेहरू युवा केंद्र गडचिरोली,  उपसिथत होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन क्रिडाधिकारी मदन टापरे यांनी केले. तर आभार स्वीप सदस्य कृष्णा रेड्डी यांनी मानले. या कार्यक्रमासाठी राज धुडसे निवडणूक लिपीक,  प्रविण आदे अव्वल कारकून,  किशोर मडावी अव्वल कारकून,  रोहित भादेकर लिपीक,  गणेश गेडाम लिपीक,  विवेक दुधबळे लिपीक यांनी विशेष सहकार्य केले. सदर कार्यक्रमातील रांगोळी स्पर्धेकरीता परीक्षक म्हणून संध्या येलेकर मॅडम, अबोली लांबे मॅडम, विना हेमके मॅडम तसेच चित्रकला स्पर्धेकरीता श्री.एस.बी.धात्रक सर, श्री.संजय घोटेकर सर, श्री.दिलीप धोडरे सर, सदर स्पर्धेमध्ये  परिक्षक म्हणून काम पाहिले.
 
जिल्यातील विविध कार्यक्रमात सहभागी झालेल्या मतदार, नागरीक, कर्मचारी यांचे खूप खूप आभार की त्यांनी स्वीप हा मतदार जनजागृतीचा कार्यक्रम घरोघरी पोहचविला. आपल्या सर्वांच्या योगदानामुळे निश्चितच आपल्या जिल्हयाची मतदानाची टक्केवारी वाढण्यास मदत होणार आहे. अजून उर्वरीत कालावधीत आपल्याला उर्वरीत मतदारांपर्यंत पोहचून जनजागृती करावयाची आहे. 
- जिल्हाधिकारी शेखर सिंह


संकल्प पत्र व मतदार चिठ्ठयांचे वाटप 

एकीकडे रॅलीमधून जिल्हाभर मतदान प्रचार प्रसार सुरू आहे तर अति दुर्गम भागात निवडणूक कर्मचारी पायी फिरत मतदारांना निवडणूकीत सहभागी होण्यासाठी गृहभेटी देत आहेत. प्रत्येक तालुक्यात बीएलओ  यासाठी कार्य करत आहेत. भामरागड येथे कैलास अंडील यांच्या मार्गदर्शनाखाली संकल्पपत्र व मतदार चिठ्ठयांचे वाटप जोमाने सुरू आहे. दुर्गम भागातील मतदारांनी मतदान करावे यासाठी निवडणूक कर्मचारी घरोघरी पोहचून मतदारांना मार्गदर्शन करत आहेत.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-10-17


Related Photos