महत्वाच्या बातम्या

 लोकसभा निवडणुकीसाठी १९ उमेदवारांचे नामांकन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : ०८ वर्धा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज १९ उमेदवारांनी त्यांचे नामांकन अर्ज जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर केले. आज नामांकन अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत होती.

आज ४ एप्रिल रोजी रामराव बाजीराव घोडसकर-ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक, मोहन रामराव राईकवार- बहुजन समाज पार्टी, अनील केशवरावजी घुशे - अपक्ष, दिक्षिता आनंद टेभुर्णे -देश जनहित पार्टी, किशोर पवार - अपक्ष, पुजा मुंकुदराव शेंदरे - अपक्ष, डॉ. मोरेश्वर रामजी नगराळे - रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया, कृष्णा अन्नाजी कलोडे - हिंदराष्ट्र संघ, प्रकाश लक्ष्मण मोटवाणी - अपक्ष, सुहास विठ्ठलराव ठाकरे - अपक्ष, विजय ज्ञानेश्वर श्रीराव -अपक्ष, आसिफ खान पठाण - अपक्ष, माधुरी अरुणराव डहारे -अपक्ष, कुष्णा सुभाषराव फुलकरी-लोकस्वराज्य पार्टी, उमेश सोमाजी वावरे यांनी महाराष्ट्र विकास आघाडी व अपक्ष असे एकुण २ अर्ज, आशिष लेखीराम इझनकर- यांनी अपक्ष व विदर्भ राज्य आघाडी असे एकुण २ अर्ज, मारोती गुलाबराव उईके-गोंडवाना गणतंत्र पार्टी या उमेदवारांनी एकुण १९ नामांकन अर्ज दाखल केले.

आज शुक्रवारी ५ एप्रिल २०२४ रोजी अर्जाची छाननी करण्यात येणार आहे. ८ एप्रिल २०२४ रोजी उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. २६ एप्रिल २०२४ रोजी मतदान होणार असून ४ जून २०२४ रोजी मतमोजणी होणार आहे.





  Print






News - Wardha




Related Photos