रिझर्व्ह बँकेने दोन हजार रुपयांच्या नोटांची छपाई थांबवली


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं  २००० रुपयांच्या नोटांची छपाई थांबवल्याची माहिती समोर आली आहे. चालू आर्थिक वर्षात २००० रुपयांची एक नोटही छापली नाही. माहिती अधिकारात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आरबीआयनं ही माहिती दिली.
केंद्र सरकारनं २०१६ मध्ये नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर पहिल्यांदाच २००० रुपयांची नोट चलनात आणली. काळ्या पैशाला चाप लावण्यासाठी ५०० आणि १००० रुपयांची नोट चलनातून बाद करण्यात आली. त्यानंतर २००० रुपयांची नोट चलनात आणण्यात आली. यावरून केंद्र सरकार आणि आरबीआयवर टीकाही झाली. जाणकारांच्या मतांनुसार, जास्त मूल्याच्या या नोटेमुळं पुन्हा काळा पैसा वाढेल. याशिवाय २००० रुपयांच्या नोटेमुळं सुट्ट्या पैशांची समस्याही वाढेल, असंही त्यांनी सांगितलं होतं.
'द न्यू इंडियन एक्सप्रेस'ने आरबीआयकडे माहिती अधिकारात माहिती मागवली होती. त्याला उत्तर देताना आरबीआयने चालू आर्थिक वर्षात २००० रुपयांची एकही नोट छापली नाही, अशी माहिती दिली आहे. आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये २००० रुपयांच्या ३५४.२९ कोटी नोटा छापण्यात आल्या. तर २०१७-१८ मध्ये ११.१५ कोटी नोटांची छपाई करण्यात आली होती. २०१८-१९ मध्ये ४.६६ कोटी नोटांची छपाई करण्यात आली. तर चालू आर्थिक वर्षात एकही नोट छापण्यात आली नाही, अशी माहिती आरबीआयने दिली आहे.



  Print






News - World | Posted : 2019-10-17






Related Photos