१८ ऑक्टोबरला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची अहेरी येथे प्रचार सभा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी /गडचिरोली :
भाजपाचे नेते, केंद्रीय गृहमंत्री हे अहेरी विधानसभा क्षेत्राचे भारतीय जनता पार्टी - शिवसेना युतीचे उमेदवार राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम यांच्या प्रचारार्थ अहेरी येथे येत आहेत. १८ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता प्रचार सभा आयोजित करण्यात आली आहे.
सकाळी १०.२०  वाजता नागपूर येथे दाखल होतील. १०.३० वाजता हेलिकाॅप्टरने अहेरीकडे प्रयाण करतील. ११.५०  वाजता अहेरी येथे दाखल होतील. दुपारी १ वाजता प्रचार सभेला संबोधित करतील. दुपारी १.०५ वाजता हेलिकाॅप्टरने राजुराकडे प्रयाण करतील. अहेरी येथे प्रचार सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. प्रचार सभेला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन भाजपाच्या वतीने करण्यात आले आहे.

 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-10-16


Related Photos