महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


४ एप्रिल महत्वाच्या घटना

१८८२ : ब्रिटन च्या पहिल्या इलेक्ट्रिक ट्राम ईस्ट लंडन मध्ये चालू झाल्या .

१९४४ : दुसरे महायुद्ध- ब्रिटिश व अमेरिकन फौजांनी रुमानियातील बुखारेस्टवर केलेल्या बॉम्बहल्ल्यात ३००० नागरिक ठार झाले.

१९४९ : पश्चिम युरोपातील अकरा देश आणि अमेरिका अशा १२ देशांनी नाटो (NATO) या संस्थेची स्थापना केली.

१९६८ : जेम्स अर्ल रे यांनी मार्टिन ल्यूथर किंग (ज्यु.) यांची हत्या केली.

१९६८ : नासाने अपोलो-६ चे प्रक्षेपण केले.

१९९० : लता मंगेशकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला.

४ एप्रिल जन्म

१८२३ : जर्मन-ब्रिटिश विद्युत अभियंता सर कार्ल विल्हेम सीमेन्स यांचा जन्म. (मृत्यू: १९ नोव्हेंबर १८८३)

१८४२ : फ्रेंच गणिती एडवर्ड लुकास यांचा जन्म. (मृत्यू: ३ ऑक्टोबर १८९१)

१८९३ : पायोनियर इन्स्ट्रुमेंट कंपनी चे सहसंस्थापक चार्ल्स हर्बर्ट कॉल्विन यांचा जन्म. (मृत्यू: ३ जुलै १९८५)

१९०६ : फिशर इलेक्ट्रॉनिक्स चे स्थापक एवेरी फिशर यांचा जन्म. (मृत्यू: २६ फेब्रुवारी १९९४)

१९०२ : ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक पं नारायणराव व्यास यांचा जन्म. (मृत्यू: १ एप्रिल १९८४)

१९२६ : ॲमवे कंपनी चे सहसंस्थापक रिचर्ड डेवोस यांचा जन्म.

१९३३ : डावखुरे मंदगती गोलंदाज बापू नाडकर्णी यांचा जन्म.

१९७३ : भारतीय संचालक आणि पटकथालेखक चंद्र शेखर येलेती यांचा जन्म.

४ एप्रिल मृत्यू

१६१७ : स्कॉटिश गणितज्ञ आणि लॉगॅरिथम सारणीचे जनक जॉन नेपिअर यांचे निधन.

१९२३ : ब्रिटिश गणितज्ञ जॉन वेन यांचे निधन. (जन्म: ४ ऑगस्ट १८३४

१९२९ : मर्सिडीज-बेंझ कंपनीचे संस्थापक कार्ल बेन्झ यांचे निधन. (जन्म: २५ नोव्हेंबर १८४४)

१९३१ : फ्रेन्च उद्योगपती आंद्रे मिचेलिन यांचे निधन. (जन्म: १६ जानेवारी १८५३)

१९६८ : नोबेल पारितोषिक विजेते मार्टिन ल्यूथर किंग (ज्युनियर) यांची हत्या झाली. (जन्म: १५ जानेवारी १९२९)

१९७९ : पाकिस्तानचे चौथे राष्ट्राध्यक्ष आणि ९ वे पंतप्रधान झुल्फिकार अली भत्तो यांचे निधन. (जन्म: ५ जानेवारी १९२८)

१९८७ : ज्ञानपीठ पारितोषिक विजेते हिंदी लेखक आणि वृत्तपत्रकार सच्चिदानंद हिरानंद वात्स्यायन उर्फ अज्ञेय यांचे निधन. (जन्म: ७ मार्च १९११- खुशीनगर, देवरिया, उत्तर प्रदेश)

१९९६ : संस्कृत आणि मराठी साहित्यिक आनंद साधले यांचे निधन. (जन्म: ५ जुलै १९२०)

२००० : कलादिग्दर्शक वसंतराव कृष्णाजी गोंधळेकर यांचे निधन.

२०१६ : भारतीय वकील आणि राजकारणी पी. ए. संगमा यांचे निधन. (जन्म: १ सप्टेंबर १९४७)





  Print






News - todayspecialdays




Related Photos