अनंतनागमध्ये चकमक ; तीन दहशतवाद्यांचा खात्मा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. काल रात्री उशिरा ही चकमक सुरू झाली होती सुरक्षा दलाच्या जवानांनी तीन दहशतवाद्यांना घेरले होते. या चकमकीत हिजबुलचा एक कमांडर ठार झाल्याचे वृत्त आहे.
अनंतनागमधील बिजबेहरा परिसरात ही चकमक सुरू होती. या ठिकाणी काही दहशतवादी लपले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर त्यांनी काल रात्री शोधमोहीम सुरू केली. या दरम्यान दहशतवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार सुरू केला. त्याला सुरक्षा दलाच्या जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. आज सकाळी अखेर या तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. यामध्ये दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर नासीरचा खात्मा समावेश आहे.



  Print






News - World | Posted : 2019-10-16






Related Photos