महत्वाच्या बातम्या

 लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १ कोटीहून अधिक मुद्देमाल जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस

प्रतिनिधी / भंडारा : आगामी लोकसभा निवडणुक २०२४ च्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नियुक्त केलेल्या यंत्रणांनी कारवाई करत १ कोटी १ लाख रुपये किमतीचे मादक पदार्थ, दारू तसेच अन्य साहित्य जप्त केले आहे. 

राज्य उत्पादन शुल्क व पोलीस विभागामार्फत भंडारा विधानसभा क्षेत्रात ४७ लक्ष ९३ हजार ६५६ साकोली क्षेत्रात ८ लक्ष १२ हजार ८५५ तर तुमसर विधानसभा क्षेत्रात ४५ लक्ष ५९ हजार २१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एकूण १ कोटी १ लक्ष ६५ हजार ७२१ रुपयाचा मुद्देमाल कारवाई अंतर्गत जप्त करण्यात आला आहे. 





  Print






News - Bhandara




Related Photos