महत्वाच्या बातम्या

 बोलेरो वाहनातून अवैध दारू तस्करी : ३ लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल केला जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस

प्रतिनिधी / आष्टी : दारू तस्करांनी वेगवेगळ्या शक्कली लढवून अवैध दारू तस्करी करीत आहेत. परंतू पोलीस सुद्धा अलर्ट झाले असल्याने ते पोलीसांच्या जाळ्यात अडकणारच आहेत. हे सर्वश्रुत आहे. 

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना प्रलोभन दाखविण्यासाठी दारुचा सुद्धा प्रयोग केला जातो. म्हणून आष्टी पोलीस रात्रीची गस्त करीत असताना येणापूर ते जैरामपूर मार्ग क्रमण करीत असताना मुधोली चक १ येथे एक बोलेरो एम.एच. ३४ एक.व्ही २१३६ हे वाहन संशयास्पद दिसले असता  पंचासमक्ष तपासणी केली. तेव्हा सदर वाहनात ९० एम एल च्या देशी दारूचे बाक्स किंमत ९६ हजार रुपये व वाहनाची किंमत तिन लाख रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. व कलम ६५ (अ) ८३ मुदाका नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे. 





  Print






News - Gadchiroli




Related Photos