महत्वाच्या बातम्या

 कुनघाडा (रै.) येथे घरकुल बांधकामांना गती


विदर्भ न्यूज एक्सप्रेस

तालुका प्रतिनिधी / चामोर्शी : अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन माणसाच्या  मूलभूत गरजा आहेत. आपल्या सुरक्षेसाठी घरकुल महत्वाचे असल्यामुळे जो तो घरकुलाचे स्वप्न बघत असतो समाजातील सर्वात गरीब, विधवा, निराधार, विकलांग आदी लोकांच्या घरकुल स्वप्नपर्तीसाठी मोदी आवास योजना सुरू करण्यात आली असून, पंचायत समिती चामोर्शी अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत  कुनघाडा (रै.) अंतर्गत घरकुल बांधकामांना गती प्राप्त झाली आहे. 

येथील दीव्यांग घरकुल लाभार्थी वेदांत पुंडलिक भांडेकर यांच्या घरकुल बांधकामाचे भूमिपूजन ग्रामपंचायत सदस्य वैभव दूधबळे यांच्या हस्ते नुकतेच पार पडले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अतुल भांडेकर, पत्रकार पुंडलिक भांडेकर, मारोती दूधबळे, परशुराम सूरजागडे, प्रेरणा भांडेकर उपस्थित होते. 

कुनघाडा ग्रामपंचायत अंतर्गत १४० घरकुलाना मंजुरी मिळाली आहे. त्यापैकी ११९ घरकुलांना निधी प्राप्त झाला. तर उर्वरित २१ घरकुल लाभार्थी अद्यापही निधी मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. सरपंचा अलका धोडरे, उपसरपंच अनिल कुनघाडकर, ग्रामविकास अधिकारी रवींद्र कुनघाडकर व सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनात कुनघाडा (रै.) येथे घरकुल बांधकामांना जोमाने सुरुवात झाली असून, उर्वरित १९ घरकुल लाभार्थींचा निधी तत्काळ पाठवावा, अशी मागणी प्रतीक्षेत असलेल्या लाभार्थीनी केली आहे. 





  Print






News - Gadchiroli




Related Photos