महत्वाच्या बातम्या

 परमानंद तिराणिक यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्रदान


विदर्भ न्यूज एक्सप्रेस

तालुका प्रतिनिधी / वरोरा : पुरस्काराचे शतक गाठनारे आचार्य परमानंद तिराणिक कलाशिक्षक यांना यावर्षीचा जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडलाच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्य विदर्भ हिंदी साहित्य संमेलनाच्या मधुरम सभागृहात नागपुर येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पुरस्काराचे स्वरूप सम्मान चिन्ह, सन्मापत्र,आंबेडकरवादी साहित्य ग्रंथ, व पुष्पगुच्छ या स्वरुपाचे होते. पुरस्कार सोहल्याप्रसंगी मंचावर महामंडलाचे अध्यक्ष डॉ. दिपककुमार खोबरागड़े नाटककार डॉ. सुनील रामटेके, छत्रपति संबाजी नगर, मिलिंद महाविद्यालयाचे प्राचार्या डॉ. वैशाली प्रदान, कादबकार विद्याधर बंसोड, प्रसिद्ध चित्रकार श्रीधर अंबोरे, महामंडलाचे सचिव डॉ. रविन्द्र तिरपुड़े, कायदेविविषयक सल्लागार एड. भूपेश पाटील यांची उपस्थिति होती. तसेच विविध क्षेत्रात लिखान करणाऱ्या लेखकांना व उल्लेखनीय काम करणारयाना राष्ट्रीय, राज्यस्तरीय पुरस्कार देउन त्यांचाही सत्कार करण्यात आला.

आचार्य परमानंद तिराणिक कलाशिक्षक यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाची उद्देशिका हि पन्नास पैशाच्या लाखो पोस्ट कार्ड वर स्वहस्तक्षरात लिहुन  त्यानी जनजागृति केली. तसेच शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. शहरी भागातील मुलापेक्षा ग्रामीण भागातील वंचित घटकातील मुले अधिक मागे राहु नये म्हणून त्यानी त्यांच्यासाठी विशेष कलावर्ग घेऊन निशुल्क प्रशिक्षण वर्ग दिले. त्यांच्या कलेला जगतिक बाजारपेठ मिलावी म्हणून प्रत्येक विद्यापीठामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदामध्ये वारली चित्रकला व आदिवासी बांबू कला यविषयी जनजागृति केली. अशा विविध माध्यमातून समाजप्रबोधनाचे ते कार्य करित आहे. त्यांना आतापर्यंत शेकडो पुरस्काराने सम्मानित करण्यात केल्याबद्दल अनेक मान्यवरानी शुभेच्छा पत्रांचा वर्षाव केला आहे. त्यांचे मित्रमंडली प्रवीण कापसे कलाशीक्षक, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी मंडली, विदर्भ साहित्य संघाचे सर्व सदस्य मंडली व कला क्षेत्रतील दिग्गजानी अभिनंदन केले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos