महत्वाच्या बातम्या

 सिंदेवाही तहसीलदारांनी रेती तस्करांच्या आवळल्या मुसक्या : महसूल विभाग ॲक्शन मोडवर


- वरती बैलाच्या चारा, खाली रेती : अवैध रेती वाहतुकीचा नवा फंडा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : रेती तस्करांनी रेतीच्या अवैध वाहतुकीसाठी नवीन फंडा अमलात आणले असून गोपनीय माहितीच्या आधारे सिंदेवाही तहसीलदार यांनी सोमवार १ एप्रिल ला दुपारच्या सुमारास मुरमाडी रेती घाट मार्गावर ता. सिंदेवाही शिवारात केलेल्या कारवाईत स्पष्ट झाले. विना क्रमांकाच्या ट्रॅक्टर मध्ये खाली रेती आणि वर बैलाचा चारा भरून नेत असल्याचे आढळून आले असता. तहसीलदार संदीप पानमंद यांना ट्रॅक्टर मुरमाडी रेती घाट मार्गावरून निघाल्याने संशयस्पद वाटल्यामुळे सदर रेतीच्या ट्रॅक्टर, अडवून पहाणी केली असता ट्रॉलीमध्ये वर बैलाच्या चारा (तनीस) आणि खाली रेती आढळून आली.

पुढील कारवाईसाठी तहसील कार्यालयात १ ब्रास रेतीसह जप्त करण्यात आली आहे. विना क्रमांक असलेल्या या सदर ट्रॅक्टर ट्रॉलीवर दंडात्मक कारवाई साठी चिमूर उपविभागीय अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठविला आहे, असे सिंदेवाही तहसीलदार संदीप पानंमद यांनी सांगितले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos