मजूरांच्या स्थलांतरणामुळे ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात मतदानाची टक्केवारी घटणार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / ब्रम्हपुरी :
विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराचा धुरळा सुरू असून २१ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. राजकीय मंडळी मतांची जुळवाजुळव करीत असताना अनेक गावांमधील मजूर कामानिमित्त बाहेर स्थलांतरीत झाल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात मतदानाची टक्केवारी घटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
दरवर्षी दिवाळीआधी मजूर बाहेर जिल्ह्यात कामासाठी जातात. चंद्रपूर, यवतमाळ तसेच अन्य जिल्ह्यांमध्ये या दिवसांमध्ये सोयाबिन पिके निघतात. सोयाबिन कापणीसाठी ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील अनेक मजूर या जिल्ह्यांमध्ये जातात. दिवाळीपर्यंत हे मजूर बाहेर राहून मजूरी करतात. या मजूरीच्या पैशांतून आपला खर्च भागवित असतात. या वर्षीही ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील अनेक गावांमधून १२ ते १५ हजार मजूर बाहेर गेले असल्याची माहिती आहे. यामुळे मतदानाची टक्केवारी घटण्याची शक्यता आहे. याचा फटका नेमका कोणत्या पक्षाला बसणार याचीही चर्चा सुरू आहे. 

 
  Print


News - Chandrapur | Posted : 2019-10-15


Related Photos