ईव्हीएम बाबत नागरीकांनी कोणतीही शंका घेण्याची गरज नाही : इंदुराणी जाखड


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
ईव्हीएमबाबत निवडणुक आयोगाकडून, जिल्हा निवडणुक कार्यालयाकडुन, लोक प्रतिनिधींच्या उपस्थितीत व प्रत्यक्ष मतदानापुर्वी अशा वेगवेगळया वेळी तपासण्या केल्या जातात त्यामुळे कोणीही ईव्हीएम वरती शंका उपस्थित करण्याची गरज नाही असे निवडणूक निर्णय अधिकारी-गडचिरोली इंदुराणी जाखड यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केले. गडचिरोली विधानसभा मतदार संघातील विविध विषयांबाबत त्यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी पुर्ण मतदान प्रक्रिया डेमो स्वरूपात उपस्थित पत्रकारांना समजावून सांगितली.
यानंतर त्या म्हणाल्या जरी कोणाला ईव्हीएम बाबत शंका असेल तर त्यांच्यासाठी या कार्यालयात त्यांना प्रत्यक्ष डेमो ईव्हीएम मशीनवर माहिती देवून शंकेचे निरसन करता येईल. सकाळी ५.३० वाजता अभिरूप मतदान घेण्यात येईल.    निवडणुकीच्या अगोदर सकाळी ६ वाजता लोकप्रतिनिधींच्या उपस्थितही पुन्हा अंतिम चाचणी प्रत्येक ईव्हीएम मशीनची मतदान केंद्रात घेतली जाते. त्यामुळे ईव्हीएम मशीन १०० टक्के विश्वासाने आपले अनमोल मत नोंदवितात, याची आपणा सर्वांना खात्री देता येते. यावेळी त्यांनी उपस्थित पत्रकारांना उमेदवारांनी गुन्हेगारी विषयक माहितीची स्व:घोषणा उमेदवारांनी वेगवेगळया तारखांना वर्तमानपत्रात कशी द्यावी याबद्दल सांगितले. पत्रकारांच्या प्रश्नांवर उत्तरेही यावेळी त्यांनी दिली. पत्रकार परिषदेमध्ये इंदुराणी जाखड यांचेबरोबर सहा.निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार महेंद्र गणवीर, तहसिलदार चामोर्शी गंगथळे उपस्थित होते.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-10-15


Related Photos