महत्वाच्या बातम्या

 निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे हस्ते एसएसटी पथकांना रिफ्लेक्टिव्ह सुरक्षा जॅकेटचे वाटप


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी स्थायी निगराणी पथक (एस.एस.टी.), फिरते पथक (एफ.एस.टी.) व व्हिडीओ निगराणी पथक (व्ही.एस.टी.) यांच्यासह विविध पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही पथके २४ तास कार्यरत असून स्थायी निगराणी पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना रिफ्लेक्टिव्ह सुरक्षा जॅकेटचे वाटप जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी चेकपोस्ट उभारले असून स्थायी निगराणी पथक व फिरत्या पथकांमार्फत मोठ्या प्रमाणावर वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. या घटनेची व्हिडिओ रेकॉर्डींग करणे आवश्यक असून जिल्ह्यातील आर्वी विधानसभा मतदार संघात ६, देवळी विधानसभा मतदार संघात ५, हिंगणघाट विधानसभा मतदार संघात ४ व वर्धा विधानसभा मतदार संघात ५ अशा एकूण २० कार्यरत स्थायी निगराणी पथकांना प्रत्येकी दोन याप्रमाणे ४० रिफ्लेक्टिव्ह सुरक्षा जॅकेटचे वाटप करण्यात आले आहे.

पथकांमध्ये कार्यरत अधिकारी, कर्मचारी रस्त्यावर गस्त देतांना काळोखामध्ये विशेषत: रात्रीच्या वेळी चमकणाऱ्या या जॅकेटमुळे वाहन चालकांना रस्त्यावरील मनुष्य सहजपणे दिसून येणार असल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेमध्ये वाढ होण्यास यामुळे मदत होणार आहे.





  Print






News - Wardha




Related Photos