महत्वाच्या बातम्या

 मतदार जनजागृतीसाठी केसरीमल कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात चुनाव पाठशाळा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : मतदान केंद्राचे प्रारूप तयार करुन विद्यार्थिनींना प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया कशी असते, त्याबद्दल व्हावी तसेच मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी केसरीमल कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय, वर्धा येथे मतदार जनजागृती कार्यक्रमांतर्गत चुनाव पाठशाळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी विद्यार्थिनींमधून मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व मतदान प्रतिनिधी यांची निवड करुन त्यांना मतदान प्रक्रिया पार पाडण्याची जबाबदारी देण्यात आली. या पाठशाळेत मतदान केंद्राध्यक्ष म्हणून शर्वरी कांबळे, मतदान अधिकारी म्हणून आरजू पठाण, कल्याणी अवथळे व श्रावणी कुणघटकर तसेच मतदान प्रतिनिधी म्हणून अंतरा टेटे, स्नेहाली देशमुख, मायनूर कुरेशी यांनी काम पाहिले. तर वर्ग ९ व वर्ग ११ वीच्या सुमारे १४० विद्यार्थिनींनी चुनाव पाठशाळा कार्यक्रमात मतदान केले.

प्राचार्या जयश्री कोटगीरवार यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे नियोजन कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक अमोल वाशिमकर, कुंडलिक राठोड व रेणुका रपाटे यांनी केले. याप्रसंगी शाळेच्या प्राचार्या जयश्री कोटगीरवार, शिक्षिका श्रीमती जोशी, श्रीमती वखरे व नितीन वाघ यांनी मतदान प्रक्रियेचे निरीक्षण केले व सहभागी विद्यार्थिनींचे कौतुक केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पंकज झाडे व संजय देशपांडे यांचे सहकार्य लाभले.





  Print






News - Wardha




Related Photos