विधानसभा निवडणुक लढवीत असलेल्या अपक्ष उमेदवाराने केला १४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार


वृत्तसंस्था / शिवाजीनगर : शिवाजीनगर  विधानसभा क्षेत्रातून निवडणुकीसाठी उभा असलेल्या अपक्ष उमेदवाराने एका १४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हाजी मोहम्मद सिराज शेख असे या उमेदवाराचे नाव असून तो माजी नगरसेवक आहे. गुन्हा केल्यानंतर आपला प्रचार सोडून शेख फरार झाला आहे.
हाजी मोहम्मद सिराज शेख हा पीडित मुलीच्या मावशीचा पती आहे. अमेरिकेत शिक्षणासाठी पाठवतो असे सांगून २७ सप्टेंबरच्या रात्री स्कॉलरशिपचा फॉर्म भरण्यासाठी शेखने मला त्यांच्या घरी बोलावले होते. तेथे माझे वडीलदेखील असतील, असेही तो म्हणाला, पण प्रत्यक्षात तेथे फक्त हाजी शेख एकटाच होता. मला त्याने घरात घेतल्यानंतर माझ्यावर तो जबरदस्ती करू लागला. मी विरोध करण्याचा प्रयत्न केला पण त्याने माझ्यावर बलात्कार केला असे पीडित मुलीने तिच्या तक्रारीत म्हटले आहे. मुलीच्या तक्रारारीनुसार शिवाजीनगर पोलिसांनी हाजी मोहम्मद सिराज शेख याच्या विरोधात बलात्कार व 'पोक्सो' कलमान्वये गुन्हा दाखल केला. आरोपी हाजी फरार झाला असून शिवाजीनगर पोलीस त्याचा शोध घेत आहेत.  Print


News - Rajy | Posted : 2019-10-15


Related Photos