महत्वाच्या बातम्या

 निवडणूक खर्चविषयक बैठक व प्रशिक्षणास उमेदवारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नागपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक लढविणाऱ्या नामनिर्देशित उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले आहे. वाटपानंतर निवडणूक खर्चासंदर्भात आयोगाच्या सर्व कायदेशीर तरतूदी आणि सूचना, त्याची देखरेख आणि त्यांचे पालन न केल्यास होणारे परिणाम समजावून सांगण्यासाठी सर्व उमेदवारांची बैठक आणि प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. ३१मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे सकाळी ११ वाजता सदर बैठक व प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.

सर्व नामनिर्देशित उमेदवार, त्यांचे निवडणूक प्रतिनिधी, खर्च प्रतिनिधी यांनी या बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन नागपूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खर्च संनियंत्रण कक्षाचे नोडल अधिकारी विलीन खडसे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos