महत्वाच्या बातम्या

 श्रमदान शिबिरातून मतदान जनजागृती


- निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी उपक्रम

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत जास्तीत मतदारांनी मतदान करुन मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी  हिंगणघाट तालुक्यातील पिंपळगाव माथनकर येथे आयोजित श्रमदान शिबिर कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेच्यावतीने सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शिल्पा सोनाले यांच्या मार्गदर्शनात मतदान जनजागृती करण्यात आली.

यावेळी तहसिलदार सतीश मासाळ, नायब तहसिलदार सागर कांबळे, विस्तार अधिकारी तथा स्वीपचे नोडल अधिकारी  अशोक कोडापे, हिंगणघाट पंचायत समितीचे विषय साधन व्यक्ती  संगिता पेठे उपस्थित होते.

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदान जनजागृती करण्याकरीता तसेच निवडणूकीमध्ये मतदानाची टक्के वाढविण्यासाठी स्वीपच्या माध्यमातून निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार हिंगणघाट विधानसभा मतदार संघात मतदान जनजागृती करण्यात येत आहे. यासाठी हिंगणघाट विधानसभा मतदार संघ, रा.सु. बिडकर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना संयुक्त विद्यमाने  पिंपळगाव माथनकर येथे श्रमदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात स्वयंसेवकांना गावातील प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावावा या बाबत मार्गदर्शन करण्यात आले.

शिबिरामध्ये मतदान प्रक्रियेविषयी सखोल माहिती देण्यात आली. शंभर टक्के मतदान व्हावे व आपल्या मताचा योग्य वापर करण्याविषयी तसेच इतर ग्रामस्थांना मतदान करण्याकरिता प्रेरित करून मतदान प्रक्रिया सुरळीत व यशस्वी करण्यासंदर्भात आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाला एन एस एस कॅम्पचे आयोजक प्राध्यापक डॉ. राजू निखाडे प्राध्यापक ठक, रा. सु. बिडकर कॉलेज तसेच फार मोठ्या प्रमाणात स्वयंसेवक उपस्थित होते.





  Print






News - Wardha




Related Photos