महत्वाच्या बातम्या

 शासकीय निवृत्तीवेतन धारकांनी कोषागाराच्या परवानगी शिवाय खात्यात बदल करु नये


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : मार्च २०२४ पासुन जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत निवृत्ती वेतनाचे प्रदान ई-कुबेर प्रणाली मार्फत भारतीय रिजर्व बँकेतुन थेट निवृत्तीवेतन धारकाच्या खात्यात जमा होणार आहे. निवृत्ती वेतन धारकांनी निवृत्तीवेतन जमा होण्यासाठी कोषागारास ज्या बँकेचा विकल्प  दिला आहे. त्याच खात्याच्या आयएफएससी कोडनुसार  निवृत्तीवेन जमा होणार आहे. त्यामुळे कोषागाराच्या पुर्वपरवानगी शिवाय निवृत्तीवेतन, कुटूंब निवृत्तीवेतन  धारकांनी त्यांच्या बँक खात्यात बदल  करु नये, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी यांनी केले आहे.

ज्या निवृत्तीवेतन धारक व कुटूंब निवृत्तीवेतन  धारकांनी कोषागार  कार्यालय वर्धा यांच्या पुरवाणगीशिवाय  परस्पर बँक खात्यामध्ये बदल केला असल्यास अशा निवृत्तीवेतन धारकास निवृत्तीवेतनाच्या प्रदानास अडचण निर्माण होणार असुन भविष्यात निवृत्तीवेतन जमा न झाल्यास त्याची जबाबदारी निवृत्तीवेतन धारक कुटूंब निवृत्तीवेतन धारकांची राहील.

मार्च २०२४ पासुन निवृत्तीवेतन  कुटूंब निवृत्तीवेतनाचे प्रदान ई-कुबेर प्रणाली मार्फत होणार असुन सन २०२३-२४ च्या आयकर बाबतची वार्षिक गणना करण्याचे कामकाज पुर्ण करावयाचे असल्याने मार्च २०२४ चे निवृत्तीवेतनाचे प्रदान ५ एप्रिल नंतर होणार आहे. असे जिल्हा कोषागार अधिकारी यांनी कळविले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos