सौरव गांगुली भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष तर अमित शाह यांचा मुलगा जय शाह सचिव


वृत्तसंस्था / मुंबई :   भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अर्थात बीसीसीआयच्या अध्यक्षपदी   सौरव गांगुली यांची  नियुक्ती करण्यात आली आहे. राजीव शुक्ला यांनी ही घोषणा केली, तर सचिवपदी गृहमंत्री अमित शाह यांचा मुलगा जय शाह याची नियुक्ती करण्यात आली आहे.
 जगातील सर्वात शक्तिशाली आणि धनाढ्य क्रिकेट मंडळ असलेल्या बीसीसीआच्या अध्यक्षपदासाठी अनुराग ठाकूर आणि एन. श्रीनिवासन या दोन माजी गट आमने-सामने होते.  एका गटाने सौरव गांगुलीचे नाव पुढे केले होते. तर श्रीनिवासन यांच्या गटाने आपले वजन बृजेश पटेल यांच्या पारड्यात टाकले होते. या बैठकीत सीओए विरुद्ध देशातील सर्व क्रिकेट संघटना मिळून मोर्चेबांधणी करत होत्या. अखेर अध्यक्षपदासाठी झालेल्या खलबतांमध्ये गांगुलीचे पारडे जड ठरले.
बीसीसीआयवर आपल्या गटाचे नियंत्रण असावे, यासाठी अनुराग ठाकूर आणि एन. श्रीनिवासन यांच्या गटांनी जोर लावला होता. अखेरीस सौरव गांगुलीच्या नावावर एकमत झाले. बृजेश पटेल यांना आयपीएलचे चेअरमन बनवण्यावर एकमत झाले. अमित शहांचे चिरंजीव जय शहा यांची सचिवपदी निवड झाली तर अरुण सिंह ठाकूर यांची खजिनदारपदी निवड झाली.   Print


News - World | Posted : 2019-10-14


Related Photos