अयोध्येतील राम जन्मभूमी - बाबरी मशीद जमीन प्रकरणी आजपासून सुनावणी सुरू होणार


वृत्तसंस्था / नवी दिल्ली :  अयोध्येतील राम जन्मभूमी - बाबरी मशीद जमीन वादाची लांबत चाललेली सुनावणी आता अंतिम टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. दसऱ्यानिमित्त सर्वोच्च न्यायालयाला आठवडाभर सुट्टी होती. त्यानंतर आज, सोमवारपासून ही सुनावणी पुन्हा एकदा सुरू होणार आहे.
अयोध्या प्रकरणाची ही सुनावणी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायाधीशांच्या घटनात्मक पीठासमोर ६ ऑगस्टपासून सुरू आहे. ही सुनावणी पूर्ण होऊन अंतिम निकाल देण्यासाठी १७ ऑक्टोबरही शेवटची तारीख सर्वोच्च न्यायालयाने घोषित केली आहे.
या प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाने २०१०मध्ये निकाल दिला होता. यामध्ये वादग्रस्त २.७७ एकर जागा सुन्नी वक्फ बोर्ड, निर्मोही आखाडा व राम लल्ला यांच्यात समान विभागून द्यावी, असे म्हटले होते. या निर्णयाला आव्हान देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात सब्बल १४ अपील करण्यात आले आहेत.
आता अंतिम सुनावणीदरम्यान आज, सोमवारी मुस्लिमांचा युक्तिवाद पूर्ण होईल. त्यानंतर हिंदूंना युक्तिवाद करण्यासाठी दोन दिवस दिले जातील. शेवटी १७ तारखेला अंतिम निर्णय सर्वोच्च न्यायालय देईल.

   Print


News - World | Posted : 2019-10-14


Related Photos