महत्वाच्या बातम्या

 वर्धा विधानसभा मतदार संघातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना निवडणूक विषयक प्रशिक्षण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वर्धा विधानसभा मतदार संघातील निवडणूक विषयक कामासाठी नियुक्त केलेल्या 4 हजार २०० अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. त्यामध्ये १ हजार ५० मतदान केंद्राध्यक्ष व ३ हजार १५० मतदान अधिकारी यांचा समावेश होता.

२७ व २८ मार्च रोजी दोन टप्प्यात चरखागृह सेवाग्राम रोड, वर्धा येथे चार सत्रामध्ये प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. तसेच या दोनही दिवशी जी.एस. कॉमर्स कॉलेज येथे ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशिन हातळण्याचे मतदान पथकातील अधिकारी कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले.

प्रत्यक्ष मतदानाच्यावेळी प्राधान्याने करावयाच्या बाबी, यंत्र हाताळणीचा अधिकाधिक सराव व्हावा, मतदान यंत्रे हाताळणीबाबत तांत्रिक बाबी, मतदान प्रक्रिया सुरू होण्याच्या अगोदर मॉकपोल घेणे. मतदान कार्यपद्धती, ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट कसे हाताळावे, मतदानाच्या दिवशी मतदारांसाठी सुलभता व्हावी तसेच मतदान प्रक्रियेवेळी कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रशिक्षणाला जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल कर्डिले यांनी भेट देऊन सखोल मार्गदर्शन केले. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी दीपक कारंडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी वर्धेचे तहसीलदार संदीप पुंडेकर, सेलुचे तहसीलदार डॉ. स्वप्निल सोनवणे व निवडणूक विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी सहकार्य केले.





  Print






News - Wardha




Related Photos