अस्वलांच्या प्राणघातक हल्ल्यात महिलेचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / कुरखेडा :
तालुक्यातील खडकी  येथील महिला सकाळी शेतशिवाराकडे जात असतांना तिच्यावर अस्वलाने  प्राणघातक हल्ला केल्याने ती त्यात  गंभीर जखमी झाली. अंगारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी गडचिरोली येथे  नेत असतांना वाटेतच तिचा मृत्यू झाला. मनिषा दानशा गावडे (५०) असे मृतक महिलेचे नाव आहे. 
 प्राप्त माहितीनुसार आज  १३ ऑक्टोबर रोजी  रविवारला सकाळी आठ वाजताच्या दरम्यान खडकी येथील  मनिषा   गावडे ही  शेतावर जात असतांना तिच्यावर  अस्वलाने  हल्ला केला व त्यात ती गंभीर जखमी झाली. घटनेची माहिती गावामध्ये पसरताच खडकी येथील नागरिक व महिला  घटनास्थळावर गेले असता मनिषा गावडे ही बेशुद्धावस्थेत पडली होती. यावेळी गावकऱ्यांनी नजीकच्या अंगारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले .अंगारा येथील वैद्यकीय अधिकारी यांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य  रुग्णालय गडचिरोली येथे पाठविले .गडचिरोली येथे नेत असताना दरम्यान वाटेतच तिचा मृत्यू झाला. कुटुंबातील कर्त्या स्त्रीचा मृतू झाल्याने तिच्या  कुटुंबासमोर  संकट उभे ठाकले आहे.
 वनविभागाने  हिंस्त्र प्राण्यांचा  बंदोबस्त  करावा व  अस्वलांच्या हल्ल्यात  मृत्यू  झालेल्या महीलेच्या कुटुंबाला आर्थिक मदत करावी अशी मागणी खडकी  व परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-10-13


Related Photos