महत्वाच्या बातम्या

 आशिष गोंडाणे यांच्यासह बहुसंख्य युवकांनी केला काँग्रेस पक्षात प्रवेश


- विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / ब्रम्हपूरी : सद्या बेरोजगारीची मोठी झळ युवा वर्गाला बसत आहे. शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नसल्याने युवा हताश झाला आहे. स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकारामुळे उमेदवारांची नाउमेद होत आहे. वेगवेगळ्या भूलथापा देऊन युवकांचे लक्ष विचलित करण्याचे कारस्थान सद्याचे सरकार पद्धतशीरपणे करत असले तरी युवकांच्या ही गोष्ट लक्षात येत आहे. युवकांच्या मुख्य प्रश्नांवर काँग्रेस पक्ष आवाज उठवत असल्याने युवा वर्ग काँग्रेसशी जोडला जात आहे.

राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या विकासकामांवर व नेतृत्वावर विश्वास ठेवून ब्रम्हपूरी शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक युवकांनी काॅंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

यावेळी युवकांच्या गळ्यात काॅंग्रेस पक्षाचा दुप्पटा घालून नवप्रवेशित युवकांचे राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी स्वागत केले. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, काॅंग्रेस पक्ष हा युवकांना भरारी देण्याचे काम करीत असुन काॅंग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या सर्वांचे स्वागत आहे. राजकारणासोबत युवकांनी आपण समाजाचं काही तरी देणं लागतो म्हणुन समाजाची देखील सेवा करावी असे सांगितले.

यावेळी अॅड आशिष गोंडाणे यांच्या नेतृत्वाखाली विश्वदीप नंदगवळी, अंकुश चहांदे, विशाल मंडपे, मुकेश उरकुडे, भिमराव बनकर, प्रियांशु लोखंडे, लुथर्ण लोखंडे, पप्पू शेंडे, निखिल शेंडे, प्रदीप दमके, वृशभ कऱ्हाडे, प्रमोद साखरे, प्रफुल साखरे, आमिर गराडे, राजकुमार चन्ने, दिनेश शिवनकर, अमोल शामकुळे, जितू  खोब्रागडे, शुभम बागडे, आशिष बागडे, निखिल चहांदे, सौरभ नागदेवते, राहुल वेठे, तुषार गडपाल, अक्षय रगड, अरुण मेश्राम, भीमराव मेश्राम, विजय बनकर, वैभव पीलारे, अमित बागडे यांनी पक्षप्रवेश केला आहे.

यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष संतोष रावत, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, माजी बांधकाम सभापती विलास विखार, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष मोंटु पिलारे, माजी न.प.उपाध्यक्ष बंटी श्रीवास्तव, शहर काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष सुधाकर पोपटे यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.





  Print






News - Chandrapur




Related Photos