महत्वाच्या बातम्या

 विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा संधी द्या : खा. अशोक नेते 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : काल २७ मार्च २०२४ बुधवारी भारतीय जनता पार्टी- शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- आरपीआय- पिरिपा महायुतीचे गडचिरोली चिमूर लोकसभा मतदार संघाचे अधिकृत उमेदवार अशोक महादेवराव नेते यांच्या प्रचारार्थ प्रचार कार्यालयाचे रितसर उद्घाटन लोकसभा प्रभारी अतुल देशकर यांच्या हस्ते गडचिरोली येथील खासदार अशोक नेते यांच्या जनसंपर्क कार्यालय चामोर्शी रोड, गडचिरोली येथे करण्यात आले.

यावेळी प्रामुख्याने मंचावर खासदार अशोक नेते, जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, आमदार डॉ. देवराव होळी, लोकसभा प्रभारी तथा माजी आमदार अतुल देशकर, लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, डॉ. नितीन कोडवते, डॉ. चंदा कोडवते, डॉ. मिलिंद नरोटे, लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रमेश भूरसे, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, जिल्हा महामंत्री योगिता पिपरे, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, जिल्हा संघटनमंत्री संजय गजपुरे, महिला मोर्चाच्या जिल्हाअध्यक्षा गिता हिंगे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, सहकार प्रकोष्ठ जिल्हाध्यक्ष आशिष पिपरे, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिल पोहनकर आदी यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

प्रचार कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी खासदार अशोक नेते यांनी बोलतांना म्हणाले की, काँग्रेस नी पन्नास साठ वर्ष राज्य केल. परंतु जे काँग्रेस ला जमले नाही ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दहा वर्षात ऐतिहासिक निर्णय घेत देशाला पुढे नेण्याचे काम केले. त्यांनी पाचशे वर्षाचा राम मंदिराचा प्रश्न असेल, तिन तलाख, काश्मिर ३७० धारा असे अनेक निर्णय घेत  केलेल्या कार्य कर्तुत्वावर प्रधानमंत्री यांचे स्वप्न विजयाचा संकल्प असून अब कि बार चारसौ पार असा विजय संकल्प करत मला विजयाची खात्री असून फिर मोदी सरकार येईल, असा विश्वास आहे.

जागतिक विकासाकडे भारताची वाटचाल आहे. केंद्रातुन अनेक विकास कामे खेचून आणले आहे. ज्यात रेल्वे चा प्रश्न असेल, सिंचनाचा प्रश्न असेल, रस्त्यांचे प्रश्न असेल, केंद्रीय विद्यालय, एकलव्य विद्यालय, मेडिकल कॉलेज, सुरजागड लोह प्रकल्प, हवाई पट्टी चा प्रस्ताव असे अनेक कामे प्रयत्नाने मंजूर करून घेण्यात सिंहाचा वाटा आहे. एवढेच नाही तर रेल्वे सर्व्ह लाईन चे सुद्धा काम मंजूर केलेले आहे. याबरोबरच वडसा गडचिरोली रेल्वे लाईन चे काम प्रगती पथावर सुरु आहे.

पुढे बोलतांना अनेक मोठया नेत्यांचा नुकताच भाजपात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकर्तृत्वावर विश्वास ठेवून पक्ष प्रवेश केला. आपण डुबत्या नाँव्हेला सोडून तैरणाऱ्या नाँव्हेत बसण्याचा पसंद केला. आपले स्वागत व अभिनंदन करतो. यात होणाऱ्या विजयाचा आपला सुद्धा सिंहाचा वाटा राहील. अशी आशावाद अपेक्षा व्यक्त करतो. तसेच भाजपामध्ये सर्वांना न्याय देण्याचे काम केल्या जाईल. व प्रधानमंत्री यांचे विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला पुन्हा एकदा संधी द्यावी, असे प्रतिपादन प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी खासदार अशोक नेते यांनी केले.

प्रचार कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी मान्यवरांचे विचार -

लोकसभा प्रभारी तथा माजी आमदार अतुल देशकर यांनी उदघाटन प्रसंगी म्हटले, या प्रचार कार्यालयाचे विधी उद्घाटन झाले असे घोषित करतो. प्रधानमंत्री यांनी केलेल्या कार्य कौशल्यावर लोकप्रियता मिळाली, एवढी लोकप्रियता कोणालाही मिळाली नाही. बोले तैसा चाले त्याची वृंदावी पाऊले असे कार्य करत भारताची अर्थव्यवस्था बळकट करत तिसऱ्या क्रमांकावर आणण्याचा काम केले. मोदी की गॅरंटी है अभिमानाची ज्योत अशीच तेवत तिसऱ्यांदा अशोक नेते यांना बहुमताने विजयी करायचा आहे. असे मत प्रचार कार्यालयाचे उदघाटन प्रसंगी केले.

आदिवासी प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी आपले विचार व्यक्त करतांना म्हणाले, पंतप्रधान मोदींच्या कार्यकर्तृत्वाला पाठिंबा द्या. देशाच्या सर्वोच्च पदावर राष्ट्रपती म्हणून पहिल्यांदा आदिवासी महिला द्रौपदी मुर्मू हे विराजमान झाले. आदिवासी समाज बांधवसाठी अभिमान आहे. प्रधानमंत्री नी केलेले कार्य अतिशय लौकिक आणि मोलाचे असून विकास कामाचे नेतृत्व आहे. त्यांचे कार्य कौशल्यावर प्रभावित होऊन पक्षात प्रवेश केला. अब की बार चारसौ पार होऊन अशोक नेते हे विजयी हॅट्रिक मारतीलचं, आपल्यामध्ये सामावून एक संघाने आपण काम करूया व नेते यांना बहुमताने निवडून आणून या विजयात सुद्धा खारीचा वाटा राहील. असा विश्वास व्यक्त करत प्रतिपादन केले.

भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांनी बोलतांना संघटनेचा अध्यक्ष म्हणून पक्षात नवीन आलेल्या पाहुण्यांचे खूप खूप अभिनंदन करतो. संघटनेमध्ये काम करत असतांना एक संघाने एकजुटीने काम केले पाहिजे. भाजपा पार्टी एक परिवार आहे. एकसंघ परिवार समजून काम करते. कुठल्याही पद्धतीचे मतभेद न करता काम करावे. आपण भाजपात आले आपले स्वागत व अभिनंदन आहे. आपला सुद्धा पक्षात मान सन्मान केल्या जाईल. आपल्याला पक्षात समाविष्ठ करत विश्वासाने, मानसन्मान होईल. विजयी संकल्प आपलाच होईल, असा विश्वास देत अतिशय सुंदर संघटनेबद्दल मार्गदर्शन केले.

डॉ. चंदा कोडवते यांनी आपल्या भावना व्यक्त करत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे जे नेतृत्वाचे व्हिजन आहे. जसे बोलतात तसे करून दाखवतात. राष्ट्रप्रेम, राष्ट्रभावना आहे. त्यांचे कार्यकर्तृत्वावरच विश्वास ठेवून पक्षात प्रवेश केला. काँग्रेसमध्ये लीडरशिप क्वालिटी आहे. जे बोलतात ते करत नाही. कर्तव्य शून्य, अभ्यासू शून्यता आहे. त्यामुळे काँग्रेसला राम राम ठोकला. विजयासाठी एकत्र येऊन अब की बार चारसौ पार होऊन नेते यांचा विजयी एकमेव उमेदवार आहेत, असे प्रतिपादन या प्रसंगी केले.

डॉ. नितीन कोडवते म्हणाले, एक चांगले व्यक्तीमत्व म्हणून नेते यांना उमेदवारी मिळाली याचा अभिनंदन

लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे म्हणाले, चरित्र संपन्न, आर्थिक व्यवस्थेत देशाला पुढे नेणारा नेतृत्व पंतप्रधान लाभले यासाठी कमळालाच मतदान करुया

डॉ. मिलिंद नरोटे म्हणाले, प्रधानमंत्री याचा विकसित भारत संकल्प वाटचाल यशस्वीपणे ठरत, जागतिक महासत्तेकडे देश चाललाय, यासाठी अब की बार चारसौ पार होऊन नेते यांचा विजयी संकल्प नक्कीच होईल. 





  Print






News - Gadchiroli




Related Photos