'एलआयसी' ने सहाय्यक पदाची पूर्वपरीक्षा पुढे ढकलली, ३० व ३१ ऑक्टोबरला होणार परीक्षा


वृत्तसंस्था / मुंबई :  'एलआयसी' ने सहाय्यक पदाची पूर्वपरीक्षा पुढे ढकलली असून आता ही परीक्षा ३० व ३१ ऑक्टोबर रोजी होणार आहे. सुरुवातीला ही परीक्षा २१ व २२ ऑक्टोबरला होणार होती, पण राज्यात विधानसभा निवडणूक जाहीर झाल्याने परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला.
भारतीय आयुर्विमा महामंडळ स्थानीय लोकाधिकार समितीच्या पदाधिकार्‍यांनी परीक्षा आणि निवडणूक एकाचवेळी येत असल्याची बाब एलआयसी व्यवस्थापनाच्या निदर्शनास आणून देत परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली. त्यानुसार एलआयसीने परीक्षेच्या वेळापत्रकात बदल केला. स्थानीय लोकाधिकार समितीच्या अनेक वर्षांच्या मागणीनंतर भारतीय आयुर्विमा महामंडळात देशपातळीवर तब्बल ८ हजार ५०० व महाराष्ट्रामध्ये सुमारे १ हजार १०० सहाय्यकांची रिक्त पदे भरली जात आहेत. त्यासाठीची पूर्वपरीक्षा २१ व २२ ऑक्टोबर रोजी होणार होती, पण आता ती ३० व ३१ ऑक्टोबरला होणार आहे. परीक्षार्थींनी परीक्षेच्या बदललेल्या तारखेची नोंद घ्यावी, असे आवाहन एलआयसी स्थानीय लोकाधिकार समितीचे सरचिटणीस गोपाळ शेलार यांनी केले आहे.   Print


News - Rajy | Posted : 2019-10-13


Related Photos