महत्वाच्या बातम्या

 हत्तीरोग दुरीकरण मोहिमेचे जिल्हास्तरीय उद्घाटन


- हत्तीरोगाच्या उच्चाटनासाठी, वयोगटानुसार हत्तीरोग प्रतिबंधात्मक गोळयांचे सेवन करा : समीर कुर्तकोटी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : जिल्हयातून हत्तीपाय रोगाबाबतची विकृती कमी करण्यासाठी आरोग्य विभागामार्फंत २६ मार्च ते ०५ एप्रिल २०२४ दरम्यान सामुदायीक औषधोपचार मोहिम जिल्हयातील भंडारा तालुक्यात राबविली जात आहे. लोकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांसमोर गोळयांचे सेवन केल्याने हत्तीरोगाचा प्रतिबंध होऊ शकतो. त्यामुळे हत्तीरोग प्रतिबंधात्मक गोळयांचे वयोगटानुसार सेवन करुन सुरक्षीत रहा असे आवाहन, मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी, जिल्हा परिषद, भंडारा यांनी केले.

जिल्हास्तरीय उद्घघाटन प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रत्यक्ष गोळी खाऊन मोहिमेची सुरवात केली. या वेळी माहिती देतांना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद सोमकुंवर, जि.प. भंडारा यांनी सांगीतले की, यामध्ये डीईसी, अल्बेंन्डाझोल व आयव्हरमेक्टीन हे औषधे वयोगट आणि उंचीनुसार देण्यात येणार आहे. प्रशिक्षीत आरोग्य कर्मचारी बुथवर व घरोघरी भेटी देवून पूर्वनिश्चित डोस नुसार ही औषधे देतील, हि औषधे रिकाम्या पोटी घेऊ नये तसेच दोन वर्षाखालील मुले, गरोदर महिला व गंभीर आजारी व्यक्तींना ही औषधे दिली जाणार नाही. महाराष्ट्र राज्य हत्तीरोग मुक्त करण्यासाठी मोहिमे दरम्यान भंडारा तालुक्यातील २ लाख ७२ हजार व्यक्तींना हत्तीरोग प्रतिबंधक औषधी देण्याचे लक्ष असल्याचे डॉ. कविता कविश्वर, जिल्हा हिवताप अधिकारी यांनी सांगीतले.

सामुदायीक औषधोपचार मोहिमेचे राज्यस्तरीय पर्यवेक्षक डॉ. शरद जोशी जिल्हा हिवताप अधिकारी अमरावती, जुनेद सय्यद प्र.शा.वै.अ., बी.जी. घुमाळ आरोग्य पर्यवेक्षक यांच्या मार्गदर्शनात सदर मोहिम राबविण्यात येणार आहे.

जिल्हास्तरीय उद्घघाटन कार्यक्रमास सर्व विभागाचे विभाग प्रमुख तसेच अनिल बनकर, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी, प्रशांत भुरे आरोग्य निरिक्षक, आशा स्वयंसेविका आणि हिवताप विभागाचे कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.





  Print






News - Bhandara




Related Photos