गडचिरोली विधानसभा क्षेत्रात उमेदवारांची संख्या वाढल्याने प्रत्येक मतदान केंद्रावर लागणार दोन बॅलेट युनिट


- गडचिरोली विधानसभा क्षेत्रात ३४६ मतदान केंद्र
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
२१ ऑक्टोबर  रोजी विधानसभा निवडणूकीसाठी मतदान होत आहे.   गडचिरोली विधानसभा क्षेत्रात १६   उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. यामुळे सर्वच मतदान केंद्रांवर एक कंट्रोल युनिट, दोन बॅलेट युनिट आणि १ व्हीव्हीपॅट  मशिन वापरावे  लागणार आहे. 
एका बॅलेट युनिटवर १६ बटन असतात. त्यामुळे एका बॅलेट  युनिटवर १६  उमेदवारांची नावे निश्चित केली जाणार आहेत तर दुसऱ्या बॅलेट  युनिटवर 'यापैकी कोणीही नाही' हे बटन राहणार आहे.  
गडचिरोली विधानसभा क्षेत्रात एकूण ३४६  मतदान केंद्र आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर दोन बॅलेट  युनिट   वापरावे लागणार असल्यामुळे बॅलेट  युनिटची संख्या ६९२ राहणार आहे. मागील लोकसभा निवडणूकीपासून व्हीव्हीपॅटचा वापरदेखील केला जात आहे.  तसेच दोन्ही मशिन जवळ जवळ ठेवले जाईल.  मतदानाच्या वेळी मतदान केंद्र अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून योग्य नियोजन  केले जाईल. यासाठी कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-10-12


Related Photos