महत्वाच्या बातम्या

 नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी आज ११ उमेदवारांकडून अर्ज दाखल


 - लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : नागपूर सार्वत्रिक लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी आज ११ उमेदवारांनी १४ अर्ज दाखल केले आहेत. आतापर्यंत एकूण १९ अर्ज स्वीकारण्यात आल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली.

नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी आज ॲड. उल्हास दुपारे (अपक्ष), संतोष चव्हाण (अपक्ष), बबिता अवस्थी (अपक्ष), विनायक अवचट (अपक्ष), श्रीधर साळवे (भीम सेना), सचिन वाघाडे (अपक्ष), ॲड. पंकज शंभरकर (अपक्ष), विशेष फुटाणे (बहुजन रिपब्लिक सोशलिस्ट पार्टी) आणि आदर्श ठाकूर (अपक्ष), किवीनसुका सुर्यवंशी (देश जनहित पार्टी)  यांनी प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज दाखल केला. तर विकास ठाकरे (इंडियन नॅशनल काँग्रेस) यांनी चार उमेदवारी अर्ज दाखल केले. नागपूरसाठी आज ७५ अर्जांची तर आतापर्यंत एकूण ३४७ अर्जांची उचल करण्यात आली.





  Print






News - Nagpur




Related Photos