महत्वाच्या बातम्या

 बल्लारशाह रेल्वे येथील तांत्रिक विभागाच्या समय सुचकतेने प्रवाशाचे वाचले प्राण


- जी. टी. एक्स्प्रेस मध्ये तांत्रिक बिघाड 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : उशिरा का होईना पण मध्य रेल्वे रेल्वेच्या बल्लारशाह जंक्शन येथे तांत्रिक विभागाने ट्रेन नंबर १२६१६ जी. टी. गाडी न्यू दिल्ली स्टेशन येथून  चेन्नई  कडे जाणाऱ्या ट्रेन मधील बी १ कोच च्या चाकांमध्ये मोठा तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती लक्षात येताच कोच बी १ ट्रेन पासून वेगळे केले व सुमारे तीन तास उशिरा ही ट्रेन चेन्नईकडे रवाना केली.

मिळालेल्या माहितीनुसार ट्रेन नंबर १२६१६ न्यू दिल्ली येथून २१ मार्चला दुपारी ४.३० वाजता निघाली. २२ मार्च सकाळी इटारशी जंक्शनवर असताना ट्रेनच्या बी१ कोचच्या चाकात तांत्रिक बिघाड आढळला पण बिघाड गंभीर नसल्याने समोरील स्टेशनला माहिती देत गाडी रवाना केली. पुढे ट्रेन नागपूर जंक्शन ला सकाळी ११.२५  पोहचली. बी १ कोच चा बिघाड स्पष्टपणे दिसत होता पण नागपूर जंक्शन च्या मेकॅनिकल डिपार्टमेंट ने ट्रेनला हिरवी झेंडी दिली. ट्रेन पुढील तीन तासाचा प्रवास करून बल्लारशा जंक्शन येथे दुपारी २.३५ ला पोहचली. पूर्वकल्पना असल्याने येथील मेकॅनिकल डिपार्टमेंटने बी १ कोचची बारकाईने पाहणी केली. व या निष्कर्षावर पोहोचले की ही बोगी पुढे पाठवल्यास मोठा अपघात होऊ शकतो आणि कित्येक निष्पाप प्रवाशांचा घटनेत जीव जाऊ शकतो.

यावर तोडगा म्हणून ट्रेन नंबर १२६१६ इंजिन सोडून एकूण २३ बोगींची गाडी होती तिच्यापासून सातव्या क्रमांकावर असलेला बी १ डब्बा वेगळे करण्यात आले. या कोच मधील ६० प्रवाशांना स्थलांतरित करण्यात आले.
बल्लारशाह स्टेशन मास्टर रवींद्र नंदनवार यांनी दिलेल्या माहितीनुसार ट्रेन अडीच तास उशिरा संध्याकाळी ५.०५ वाजता पुढील प्रवासाकरिता रवाना झाली. या घटनेत नागपूर जंक्शन येथे  ट्रेन नंबर १२६१६ च्या बी १ कोचच्या प्रवाशांना बिघाड झालेल्या बोगीला वेगळे करून नवीन कोच लावला असता, पण हलगर्जी पणा ढकलाढकलीची वृत्ती आज त्यांच्या जीवावर बेतली असती. नशिबाने नागपूर वरून निघाल्यानंतर बल्लारशाह स्टेशन गाठ्याच्या अगोदरच काही अनर्थ घडले नाही प्रवाशांचं नशीब. रेल्वे कर्मचाऱ्यांनी प्रवाशांची रामनाम सत्य ची पूर्ण तयारी केली होती असे म्हणावं लागेल.

नागपूर जंक्शन सारखे मोठ व तांत्रिक सुविधा असलेलं स्टेशन आहे. तेथून गाडी सुटल्यानंतर  दक्षिण विभागात विजयवाडा जंक्शन आहे. नागपूर पासून विजयवाडा स्टेशन जवळपास साडेसहाशे किलोमीटर अंतरावर असून दहा तास लागतात.या दोन्ही स्टेशन मध्ये एक्सट्रा कोच सुविधा आहे. नागपूर पासून बल्लारशाह असो किंवा पुढे वारंगल जंक्शन मध्ये सुविधा नाही आहे. नागपूर रेल्वे मेकॅनिकल डिपार्टमेंटला माहिती असून सुद्धा ट्रेन नंबर १२६१६ जी टी च्या बी १ कोचला नागपूर मध्ये बदली न करता तांत्रिक त्रुटी असून सुद्धा प्रवासांच्या जीवाशी खेळ करत पुढे पाठवून रवाना केली.





  Print






News - Chandrapur




Related Photos