महत्वाच्या बातम्या

 अधिसभा, विद्या परिषद, अभ्यास मंडळ निवडणुकीसाठी पाचही जिल्ह्यांत शांततेत मतदान पार 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या अधिसभा, विद्या परिषद आणि अभ्यास मंडळ प्राधिकारिणीच्या निवडणुकीत रविवारी 20 नोव्हेंबर रोजी अमरावती विभागाच्या अमरावती, यवतमाळ, बुलडाणा, अकोला व वाशिम या पाचही जिल्ह्रांमधील 63 केंद्रावर मतदान सुरक्षित व शांतपणे पार पडले. अधिसभा, विद्या परिषद आणि अभ्यास मंडळ या तीनही प्राधिकारिणीच्या निवडणुकीत सायंकाळी 5.00 वाजतापर्यंत अधिसभेसाठी प्राचार्य, व्यवस्थापन प्रतिनिधी, महाविद्यालयीन शिक्षक, विद्यापीठ शिक्षक, विद्या परिषद, अभ्यास मंडळे या संवर्गातील मतदारसंघारीता 95 ते 98 टक्के मतदान झाले. तर  नोंदणीकृत पदवीधर मतदारसंघामध्ये 40 ते 45 टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे.
विद्यापीठ अधिसभेवर निवडून द्यावयाच्या दहा प्राचार्य मतदारसंघामध्ये 10 जागेसाठी विविध संवर्गातील 18 उमेदवार रिंगणात, व्यवस्थापन परिषद मतदारसंघामध्ये विविध संवर्गातील 5 जागेकरीता 11 उमेदवार, महाविद्यालयीन शिक्षक मतदारसंघामध्ये विविध संवर्गातील 10 जागेसाठी 31 उमेदवार, विद्यापीठ शिक्षक मतदारसंघामध्ये विविध संवर्गातील 2 जागेसाठी 4 उमेदवार, नोंदणीकृत पदवीधर मतदारसंघामध्ये विविध संवर्गातील 10 जागेसाठी 35 उमेदवार उभे होते. विद्या परिषदेवर निवडून द्यावयाच्या विविध विद्य़ाशाखेतून 10 उमेदवार उभे होते. अभ्यास मंडळावर निवडून द्यावयाच्या विद्याशाखानिहाय प्रत्येकी तीन विभाग प्रमुख निवडून द्यावयाचे असून विविध विद्याशाखेतील 94 उमेदवार उभे होते.

मतमोजणी 22 नोव्हेंबरला
मंगळवार 22 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून विद्यापीठ परिसरातील वनस्पतीशास्त्र विभाग व ज्ञानस्त्रोत केंद्रातील अभ्यासिका सभागृहामध्ये मतमोजणी होणार आहे. कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे, प्र-कुलगुरू डॉ.विजयकुमार चौबे व कुलसचिव तथा निर्वाचन अधिकारी डॉ. तुषार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठ व महाविद्यालयातील अधिकारी व कर्मचा-यांनी मतदान कार्य पार पाडले.
विविध प्राधिकारिणीसाठी होत असलेल्या निवडणुकीमध्ये पदवीधर मतदार - 35,659, महाविद्यालयीन शिक्षक 3413, व्यवस्थापनाचे प्रतिनिधी - 239, प्राचार्य -119, विद्यापीठ शिक्षक - 59, अभ्यास मंडळामध्ये सर्व विद्याशाखेमध्ये - 1055 मतदारांची संख्या होती .





  Print






News - Rajy




Related Photos