सत्ता आमची येईल आणि भाजप विरोधी पक्ष असेल : प्रकाश आंबेडकर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर :
काँग्रेस वाले भुरटे चोर होते, तर भाजप वाले डाकू आहेत. आम्हाला भाजप ची 'बी' टीम म्हणणारे हेच काँग्रेस वाले शेवटच्या क्षणापर्यंत आमच्याशी युतीची वाट बघत होते. मुख्यमंत्री घाबरलेले आहेत, त्यांनी वंचित आघाडी विरोधी पक्ष असेल असे भाकीत केले आहे. मात्र यावेळी आम्ही सत्तेत बसू,आणि भाजप विरोधी पक्ष म्हणून काम करेल,असा घणाघात वंचित बहुजन आघाडीचे नेते व भारिप बहुजन महासंघाचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केला. 
ते बल्लारपूर विधानसभा निर्वाचन क्षेत्रातून उभे असलेले वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार राजू झोडे यांच्या प्रचारार्थ बल्लारपूर शहरात झालेल्या जाहीर सभेत बोलत होते.  यावेळी जनते कडूनच निवडणुकीसाठी आर्थिक मदतीचे आवाहन केल्या नंतर जनतेनी दानपेटीत आर्थिक मदत केली. सरतेशेवटी प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहनही त्यांनी केले 
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे चंद्रपूर निर्वाचन क्षेत्रातील उमेदवार अनिरुद्ध वनकर,राजुरा क्षेत्राचे गोदरू पाटील जुमनाके, बल्लारपूर क्षेत्राचे राजू झोडे यांची उपस्थिती होती.    Print


News - Chandrapur | Posted : 2019-10-11


Related Photos