२० हजारांची लाच स्वीकारली, कोपेला ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
सिमेंट काॅंक्रीट रस्त्याचे काम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र. देण्यासाठी २० हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी सिरोंचा तालुक्यातील कोपेला ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाविरूध्द सिरोंचा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागसू जित्रु नरोटे (३१) असे ग्रामसेवकाचे नाव आहे.  तक्रारदाराला कोपेला ग्रामपंचायत अंतर्गत अमडेली येथे दहन - दफन भूमीच्या सिमेंट काॅंक्रीट रस्त्याचे काम मिळाले होते. हे काम त्यांनी पूर्ण केले. काम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र देण्याकरीता २ टक्के प्रमाणे स्वतः व अभियंत्याच्या नावे ग्रामसेवक नागसू नरेटे याने ५० हजार रूपये लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी शहनिशा करून सापळा रचला. काल १० ऑक्टोबर रोजी ग्रामसेवक नरोटे याने ५० हजार रूपयांची मागणी करून पंच साक्षीदारासमक्ष २० हजार रूपये लाच स्वीकारली. याप्रकरणी सिरोंचा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलिस अधीक्षक रश्मी नांदेडकर, अपर पोलिस अधीक्षक राजेश दुद्दलवार,  पोलिस उपअधीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक रवि राजुलवार,सहाय्यक फौजदार मोरेश्वर लाकडे, पोलिस हवालदार प्रमोद ढोरे, नथ्थुजी धोटे, नापोशि सतिश कत्तीवार, सुधाकर दंडीकेवार, देवेंद्र लोनबले, पोलिस शिपाई महेश कुकुडकार, गणेश वासेकर, किशोर ठाकूर, महिला पोलिस शिपाई सोनल आत्राम , सोनी तावाडे, चालक नाईक पोलिस शिपाई तुळशिराम नवघरे, घनश्याम वडेट्टीवार यांनी केली आहे.  

 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-10-11


Related Photos