चिमूरच्या अपक्ष महिला उमेदवाराचे बेरोजगारांना दारू विक्रीचे परवाने देण्याचे आश्वासन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : 
चिमूरमधील अपक्ष उमेदवार वनिता जितेंद्र राऊत यांनी अजब आश्वासन दिले असून सध्या त्या चर्चेचा विषय बनल्या आहेत. आमदार म्हणून निवडून आल्यास दारूबंदी हटवून बेरोजगारांना दारू विक्रीचे परवाने देणार, गाव तिथे बिअर बार योजना राबवणार, बारमध्ये व्हिस्की, बिअर सवलतीत देणार अशी  आश्वासने  अपक्ष उमेदवार वनिता  राऊत यांनी दिली असून त्यांनी  आपल्या प्रचारात दारूबंदी हटावची मागणी अग्रस्थानी ठेवली आहे. 
चंद्रपूर जिल्ह्यात एप्रिल २०१५ पासून दारूबंदी असून त्यासाठी आदोलन करणाऱ्या श्रमिक एल्गारच्या अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी ब्रम्हपुरीत निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दारूबंदी लागू करणारे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार बल्लारपूरमधून निवडणूक रिंगणात आहेत. या पार्श्वभूमीवर वनिता राऊत यांच्या आश्वासनाने लक्ष वेधून घेतले आहे.   नागरिकांना दारू पिण्याचा अधिकार पुन्हा प्राप्त झाला पाहिजे. काही भागात मद्यप्राशन सामाजिक प्रथा असून लोकांना चोरून दारू पिण्यास व विकण्यास भाग पाडण्याशिवाय दारूबंदीने  काहीही साध्य झालेले नाही. जनता चोरून, दुप्पट-तिप्पट भावाने दारू पिते तेव्हा फार दु:ख होते. कुटुंबातील सर्वानी मिळून दारू पिल्यास घरात वाद, भांडणे होणार नाहीत.  Print


News - Chandrapur | Posted : 2019-10-11


Related Photos