महत्वाच्या बातम्या

 स्थायी निगराणी पथक व फिरत्या पथकाच्या प्रमुखांना विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांचे अधिकार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : आदर्श आचारसंहितेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी  योगेश कुंभेजकर यांच्या आदेशान्वये भंडारा जिल्ह्यात विविध पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापैकी स्थायी निगराणी पथक (एस.एस.टी.) व फिरते पथक (फ्लाईंग स्कॉड) यांच्या प्रमुखांना विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांचे अधिकार प्रदान करण्यात आले आहे.

फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ (सन १९७४ चा २) चे कलम २१ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी कुंभेजकर  यांनी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- २०२४ च्या प्रयोजनार्थ नियुक्त केलेले स्थायी निगराणी पथक (स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम) आणि फिरते पथक (फ्लाईंग स्कॉड) यांच्या प्रमुखांना निवडणूक प्रक्रिया कालावधीकरीता विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून घोषित केले आहे. तसेच त्यांना फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ च्या कलम १२९, १३३, १४३ आणि १४४ अन्वये अधिकारी प्रदान करण्यात आले आहे.

विधानसभा क्षेत्र निहाय पथकांची माहिती -
एफएसटी- तुमसर सहा भंडारा १० साकोली १० एकूण २६
एस एस टी- तुमसर १२ भंडारा ६ साकोली ६ एकूण २२
व्ही एस टी- तुमसर ४ भंडारा ४ साकोली ६, एकूण १४
व्हीव्हीटी- तुमसर २ भंडारा ३ साकोली ३ एकूण ८

अशा पद्धतीने जिल्ह्यात एकूण तीन विधानसभा क्षेत्र निहाय मध्ये ७० टीमचे गठन करण्यात आलेले आहेत.





  Print






News - Bhandara




Related Photos