आचारसंहिता काळात गावठी पिस्तुल बाळगणारे दोघे गजाआड , शिर्डी पोलिसांची कारवाई


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / शिर्डी : 
 सध्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता सुरु आहे. त्या अनुशंगाने  शिर्डी शहर हददीमध्ये अग्नीशस्त्र व हत्यारांचा शिर्डी पोलीसांमार्फत शोध सुरु असतांना पोलीस विभागास मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गावठी पिस्तुल बाळगणाऱ्या दोघांना शिर्डी पोलिसांनी अटक केली  आहे. अक्षय सुधाकर थारात (२२)  रा. जवळके, ता. कोपरगाव हल्ली रा. वाघवस्तीरोड, शिडी ता. राहाता , पवन सुभाष भोत (२२ रा. क्रांतीचौक, निमगाव ता. राहाता अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. 
 अपर पोलीस  अधिक्षक डॉ. दिपाली काळे  यांना गुप्त बातमी दारामार्फत आरोपींची माहिती मिळाली.   बातमीप्रमाणे खात्री करण्यासाठी  शिर्डी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक गंधाले, सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घगे, पो.हवा.प्रसाद साळवे, पोलीस नाईक  बाबा सातपुते,  किरण कुऱ्हे,
पोलीस शिपाई अजय अंधारे, नितीन सानप यांनी आरोपीच्या राहत्या  घराजवळ  सापळा लावला.  आरोपी अक्षय सुधाकर थारात  हा  पवन सुभाष भोत  व त्यांचा अन्य एक अल्पवयीन सहकारी  परिसराच्या मागे संशयितरित्या वावरतांना मिळून आल्याने त्यांची पंचांसमक्ष अगंझडती घेतली.  यावेळी त्यांचेकडे एक गावठी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुसे मिळुन आली .  याबाबत विचारणा केली असता त्यांना काहीही माहिती सांगता आली नाही, त्यांना पोलीस ठाण्यात आणुन त्यांचेकडे सखोल  चौकशी केली असता त्यातील अक्षय सुधाकर थोरात याने सदर गावठी पिस्टल शिरपुर जिल्हा धुळे येथुन खरेदी
केला असल्याचे सांगितले.  याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात , ९४७/२०१९ भारतीय हत्यार  कायदा कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून  आरोपींना अटक करण्यात आली आहे.  सखोल चौकशी केली जात असून त्यांचेकडे आनखी हत्यारे असण्याची शक्यता आहे.
सदर कामगिरी  पोलीस अधिक्षक ईशु सिंधु, अपर पोलीस अधिक्षक डॉ.दिपाली काळे, उपविभागिय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे  यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक गंधाले, गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक  मिथुन घुगे, पोलीस हवालदार प्रसाद साळवे, पोलीस नाईक बाबा सातपुते,पोलीस नाईक किरण कुऱ्हे,  पोलीस शिपाई अजय अंधारे, पोलीस शिपाई नितीन सानप  यांनी केली आहे.   आरोपीने सदर गावठी पिस्टल कोठुन व कशासाठी मिळविलेला होता याबाबत सखोल तपास  केला जात आहे.    Print


News - Rajy | Posted : 2019-10-10


Related Photos