वेटलिफ्टर ओंकार ओतारी गडचिरोली जिल्हा मतदार जनजागृतीसाठी आयकॉन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली  :
कॉमनवेल्थ स्पर्धेत २०१४ मध्ये कांस्य पदक विजेते ओंकार ओतारी गडचिरोली जिल्ह्याचे मतदार जनजागृती विषयक आयकॉन म्हणून नेमण्यात आले आहेत. विशेष बाब म्हणजे त्यांची तहसिलदार म्हणून १ महिन्यापुर्वीच अहेरी येथे  बदली झाली आहे. मुळचे कोल्हापूर येथील ओंकार ओतारी यांनी वेटलिफ्टींग मध्ये स्कॉटलँड येथे २०१४ च्या कॉमनवेल्थ स्पर्धेत ६९ वजनी गटात कांस्य पदक मिळविले होते.
आता प्रशासनातील कामाबरोबर त्यांना अजून एक महत्वाची जबाबदारी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली आहे. जिल्ह्याचे मतदार जनजागृती आयकॉन म्हणून त्यांना काम पाहवे लागणार आहे.
ओंकार ओतारी हे कुरुंदवाड, कोल्हापूर येथील असून त्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन वेटलिफ्टींगमध्ये प्राविण्य मिळविले. वयाच्या १२ व्या वर्षीपासून तयार झालेला हा नाद युवकांना प्रेरणा देणारा आहे. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आलेले ओंकार यांनी अनेक कौटुंबिक अडचणींना सामोरे जावे लागले आहे. त्यातूनही त्यांनी मार्ग काढत यश संपादन केले आहे. आज युवकांना प्रेरणास्थान असलेले ओंकार ओतारी गडचिरोली जिल्ह्यात अहेरी येथे तहसिलदार पदावर कार्यरत आहेत.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-10-10


Related Photos