महत्वाच्या बातम्या

 जम्मू-कश्मीरमध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलांना यश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / जम्मू काश्मीर : जम्मू-कश्मीरमध्ये दोन वेगवेगळ्या चकमकींमध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे. यातील एक चकमक ही शोपियां जिल्ह्यातील द्रास येथे झाली. त्यात तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले.

तर दुसरी चकमक ही मुलू येथे झाली. त्यात एक दहशतवादी ठार झाला.

द्रास येथील चकमकीत मारले गेलेले दहशतवादी हे जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे असल्याची माहिती मिळत आहे. यातील दोन दहशतवादी हनान बिन याकूब आणि जमशेद हे दोघेही दोन दिवसांपूर्वी झालेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या हत्येत तसेच प. बंगाल येथील एका मजुराच्या हत्येत सहभागी होते.

24 सप्टेंबर रोजी या दहशतवाद्यांनी पश्चिम बंगालच्या एका मजुराची हत्या केली होती. त्याखेरीज 2 ऑक्टोबर रोजी पुलवामाच्या पिंगलाना येथे सीआरपीएफ आणि पोलिसांच्या दस्त्यावर गोळीबार केला होता. त्यात जावेद अहमद डार या पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला होता.

दुसरी चकमक ही बुधवारी सकाळी झाली. यात एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलांना यश आलं. मुलू परिसरात अजूनही ही चकमक सुरू असल्याची माहिती मिळत आहे.





  Print






News - World




Related Photos