महत्वाच्या बातम्या

 विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा, गारपिट होत असल्यास घ्यावयाची काळजी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि गारपिटमुळे होणाऱ्या नुकसानीची काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केले आहे.

विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि गारपिट झाल्यास वृक्षरोपण, बागायती  आणि उभ्या पिकांचे नुकसान होऊ शकते. मोकळ्या ठिकाणी गारांमुळे  लोक आणि गुरे जखमी होऊ शकतात. जोरदार वाऱ्यांमुळे असुरक्षित संरचनांना नुकसान होऊ शकते. कच्च्या घरांचे, भिंती आणि झोपड्यांचे किरकोळ नुकसान होऊ शकते. सैल वस्तु उडू शकतात, अशावेळी नागरिकांनी घरातच रहावे.

नागरिकांनी घराच्या खिडक्या आणि दरवाजे बंद ठेवावे आणि शक्य असल्यास प्रवास टाळावा. सुरक्षित निवारा घ्यावा. झाडाखाली आसरा घेऊ नये. काँक्रीटच्या मजल्यावर झोपू नये आणि काँक्रीटच्या भिंतीना झुकू नये. इलेक्ट्रिक व ईलेक्ट्रॉनिक उपकरणे अनप्लग करावी. ताबडतोब जलकुंभातून बाहेर पडावे. वीजेवर चालवणाऱ्या सर्व वस्तू पासून दूर राहावे.

शेतकऱ्यांनी फळबागांमध्ये गार जाळी किंवा गारांच्या टोप्या वापरावे जेणेकरुन त्यांचे यांत्रिक नुकसान होण्यापासून संरक्षण होईल आणि बागायती पिकांना यांत्रिक सहाय्य प्रदान करणे आणि भाजीपाला स्टॅाक करणे सोपे जाईल. परिपक्व झालेली पिके आणि भाजीपाला लवकरात लवकर काढावा आणि कापणी केलेले उत्पादन सुरक्षित ठिकाणी ठवावे किंवा शेतात कापणी केलेल्या उत्पादनांचे ढीग ताडपत्रीने झाकून ठेवावे. बागायती पिके व भाजीपाला पिकांना यांत्रिक आधार द्यावा, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सचिव तथा निवासी उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे यांनी कळविले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos