मी आजवर देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा मुख्यमंत्री पाहिला नाही : केंद्रीय मंत्री अमित शहा


वृत्तसंस्था / सांगली :   केंद्रात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस या भाजपच्या डबल इंजिनमुळे महाराष्ट्र पुन्हा एकदा वेगाने प्रगतीपथावर वाटचाल करू लागला आहे. . देवेंद्र फडणवीस वयाने लहान असतील,  पण मी आजवर देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा मुख्यमंत्री पाहिला नाही असे वक्तव्य  केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी   गुरुवारी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या जत येथील सभेत केले. रेखित करण्याच प्रयत्न केला.  केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी केले.
आघाडीच्या काळात महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांचा अपवाद वगळता एकही मुख्यमंत्री सलग पाच वर्षे टिकू शकला नाही. काँग्रेसचे दिल्लीतील नेतृत्त्व सातत्याने मुख्यमंत्री बदलत राहायचे. मात्र, नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस यांना सलग पाच वर्षे काम करण्याची संधी दिली. या स्थैर्यामुळे राज्याचा विकास झाला. परिणामी देशात पुन्हा एकदा महाराष्ट्राचा दबदबा वाढू लागला आहे. 'नरेंद्र-देवेंद्र' या डबल इंजिनामुळे महाराष्ट्र देशात पुन्हा पहिल्या क्रमांकाचे राज्य होईल, असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला.
यावेळी अमित शाह यांनी आघाडी सरकारवरही टीकास्त्र सोडले. आघाडी सरकारच्या १५ वर्षांच्या काळात शरद पवारांनी सांगली आणि महाराष्ट्रासाठी काय केले?, असा सवाल त्यांनी विचारला. आघाडी सरकारच्या काळात केंद्र सरकारकडून राज्याला १,१५,५०० कोटी रूपयांची मदत मिळाली. मात्र, मोदी सरकारच्या काळात ही मदत अडीचपटींनी वाढून २,८६,३५४ कोटीवर पोहोचली, याकडे अमित शाह यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. 
  Print


News - World | Posted : 2019-10-10


Related Photos