भरधाव कंटेनरने सोलापूर- औरंगाबाद महामार्गावरील 'चेकपोस्ट' उडवले ; दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / उस्मानाबाद :
सोलापूर - औरंगाबाद महामार्गावर येडशी जवळ चेकपोस्टमध्ये कंटेनर घुसल्याने  भीषण अपघात झाला . यामध्ये दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला असून होमगार्ड गंभीर जखमी आहे. तुळजापूरला जाणाऱ्या मोठ्या चारचाकी वाहनांना वळवण्यासाठी हा चेकपोस्ट उभा केला होता.
नवरात्रोत्सव संपल्यामुळे भाविक पुन्हा आपापल्या घरी जाण्यासाठी निघाले आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पोलिसांनी पर्यायी मार्गावर वाहतूक वळवण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी त्यांनी चेकपोस्ट उभे केले होते. रात्री 3.30 च्या सुमारास अर्धा झोपेत असलेल्या पोलिसांच्या अंगावर अचानक कंटेनर आला आणि घात झाला. चेकपोस्ट जिथे आहे त्या ठिकाणी मात्र पोलिसांनी सिग्नल, लाईट सुरू न ठेवल्यानं कंटेनर चालकाला त्याची कल्पना नव्हती. भरधाव कंटेनर थेट चेकपोस्टमध्ये घुसला आणि भीषण अपघात झाला आहे.  Print


News - Rajy | Posted : 2019-10-10


Related Photos