रेल्वे विभागाने भंगार विकून केली कोट्यवधींची कमाई


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
रेल्वे विभागाने गेल्या १० वर्षांपासूनची जमा रद्द विकून तब्बल ३५,०७३  कोटी रुपयांची कमाई केली आहे. विशेष म्हणजे उत्तर पूर्वेतील तीन राज्यांच्या अर्थसंकल्पापेक्षाही ही रक्कम जास्त आहे. विकण्यात आलेल्या या रद्दीत काही डब्बे, रेल्वे ट्रॅक आणि जुन्या गाड्यांचाही समावेश आहे.
रेल्वे मंत्रालयाने गेल्या १० वर्षांत विकण्यात आलेल्या स्क्रॅप संदर्भातील एक माहिती प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार, २००९-१० ते २०१८ -१९ या कालावधीत विविध भंगार, स्कॅपची रेल्वे विभागाकडून विक्री करण्यात आली आहे. यातून रेल्वे विभागाला ३५,०७३ कोटींची कमाई झाली आहे. विशेष म्हणजे १० वर्षात विकण्यात आलेल्या रेल्वे ट्रॅकच्या कमाईतून रेल्वे विभागाला ११,९३८ कोटी रुपये मिळाले आहेत. भारतीय रेल्वे ही जगातील सर्वात मोठं रेल्वे जाळ असल्याचं सांगण्यात येतं. काश्मीर ते कन्याकुमारपर्यंत भारतीय रेल्वेचं नेटवर्क पसरलं आहे.
गावखेड्यापासून ते राजधानी दिल्लीपर्यंत रेल्वेची कनेक्टीव्हीटी आहे. रेल्वेवर देशाची मोठी अर्थव्यवस्था अवलंबून आहे. त्यामुळे गेल्या वर्षीपर्यंत रेल्वे विभागाचा स्वतंत्र अर्थसंकल्प काढण्यात येत होता. आता, रेल्वेच्या भंगार विक्रीतून मिळालेली रक्कम पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.  Print


News - World | Posted : 2019-10-10


Related Photos