महत्वाच्या बातम्या

 बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्ष गडचिरोली चिमूर लोकसभेत उतरणार


- विशेष फुटाणे प्रदेशाध्यक्ष BRSP 
- शिक्षण, आरोग्य, बेरोजगारी जनतेच्या मूळ प्रश्नांना जाहीरनाम्यात स्थान

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : आगामी लोकसभेला घेऊन महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अद्यापही उमेदवारीवरून खडाजंगी चालू असताना गडचिरोली चिमूर क्षेत्रातील एकही उमेदवार अजून जाहीर झालेला नाही. अशावेळी मागील निवडणुकीत महाविकास आघाडीचा घटकपक्ष राहिलेला बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाने गडचिरोली चिमूर लोकसभा लढविणार असल्याची घोषणा पत्रकार परिषदेत करण्यात आली.

भारतीय जनता पक्ष हा भांडवलदार समर्थक व संविधान विरोधी विचार पेरणारा पक्ष असल्याने सत्तेत आल्यास लोकशाहीसाठी अत्यंत घातक ठरणार आहे, त्यामुळे मागील निवडणुकीत आपण महाविकास आघाडीसाठी काम केले व यावेळी सुद्धा करण्याची भूमिका आहे. परंतु महाविकास आघाडी आंबेडकरी मतांचा सन्मान करत नसेल आणि आपल्याच तोऱ्यात असेल तर २० मार्च पर्यंत पक्षाचे अध्यक्ष डॉ. सुरेश माने यांच्या आदेशानुसार बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी चर्चेसाठी दार खुले ठेवणार आहे, मात्र तस न झाल्यास ताकदीने उमेदवार उतरविणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच शिक्षण, आरोग्य, बेरोजगार, शेतकरी, कामगार व विद्यार्थी मुद्याना घेऊन निवडणुकीत उतरणार असेही सांगण्यात आले.

पक्षाकडे तीन चार उमेदवार असून त्याबाबत गुप्तता पाळण्यात आली. यावेळी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष विशेष फुटाणे, प्रदेश महासचिव भास्कर बांबोळे, जिल्हा प्रभारी राज बन्सोड, जिल्हाध्यक्ष मिलिंद बांबोळे, BRSP शहर सचिव नागसेन खोब्रागडे, आदिवासी विकास परिषदेचे विनोद मडावी, कुणाल कोवे, रिटायर्ड dysp बारीकराव मडावी, brsp उपाध्यक्ष अरविंद वाळके, रिटायर्ड ASI शंकर चिंतुरी, महिला आघाडी जिल्हासचिव शहराध्यक्ष शोभा खोब्रागडे, शहराध्यक्ष विद्या कांबळे, संघटक आवळती वाळके, शहर सचिव प्रतिमा करमे, ASI घनश्याम मडावी उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos