पवनी शहरातील ऐतिहासिक आखाड्यात रावण दहन, शस्त्र पुजेला उमडला हजारोंचा जनसमुदाय


 विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
महादेव शिवरकर / पवनी  : 
विदर्भाची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पवनी शहरात हजारोंच्या संख्येत उपस्थित असलेल्या भाविकांच्या समक्ष शस्त्र पुजेचा व रावण दहनाचा कार्यक्रम मॉ चंडिका मातेच्या भव्य प्रागणात संपन्न झाला. या वेळी पवनी शहराच्या मुख्य रस्त्याने आखाड़े, दानपट्टे, अग्निचे खेळ,  रावण, आकर्षक हत्ती वर बसून असलेले रामलक्ष्मण तसेच मनमोहक  झाक्यांचे अनेक मंडळाकडुन प्रदर्शन करण्यात आले. तर दसऱ्या निमित्य शस्त्र पुजेच्या कार्यक्रमात सहभाग होणाऱ्या आखाड़े, झाकी मंडळांना प्रोत्साहनपर बक्षीस   देवुन सन्मान करण्यात आला. तसेच रावनाचे दहन  मंदिराच्या प्रागणात करण्यात आले. 
 पवनी शहर हे मंदिराचे शहर म्हणून प्रसिद्ध असलेले शहर असुन विजयादशमी हा दिवस शहर वासियांसाठी विशेष आकर्षक म्हणून असतो. प्रत्येक आखाड्यातील  पहिलवान एक महिन्यापासुन तयारीला लागत असतो . पहिलवान  हा आपल्या मार्गदर्शनात दानपट्टे, अग्निखेल, काच खेळ, तलवार बाजी, व  इतर खेळ दाखवून भाविक भक्ताचे मनोरंजन करतात तर वाघ व तंटे भिल्ल लहान मुलांचे आकर्षक असतात. 
 राज्यातील आखाड़े बदलत्या कालानुसार बंद झाले असले तरी पवनी शहरातील आखाड़े आजही  सुरु आहेत.  आखाड्यातील   वस्तादामध्ये उत्साह कमी
न होता विजयादशमी जवळ येताच उत्साह वाढताच असतो. शस्त्र पूजा वेळी आपला धर्म विसरून एकात्मतेचे प्रतीक देत हिन्दू, मुस्लिम बौद्ध, शिख सर्व समाजातील  खेळाडू आपाआपल्या कलेचे प्रदर्शन दाखवित असतात. 
  विजया दशमीच्या दिवशी गावातील व परिसरातील जनता आपआपल्या घरी  घरगुती तसेच शेती विषयक वापराचे साहित्याची पूजा करुण मॉ चंडिका च्या दर्शनाला पवनी कड़े मिळेल त्या वाहनाने येत असतात. 
 विजया दशमी च्या दिवशी शहरातील तसेच बाहेर गावाहून येणाऱ्या हजारो जनसमुदायाला कोणत्याही प्रकारचा त्रास होवू नये म्हणून अनेक स्वयंसेवी संस्थांकडून  चौकाचौकात पिण्याचे पानी, महाप्रसाद, तसेच शरबताची व्यवस्था करण्यात येत असुन शस्त्र पुजेच्या या कार्यक्रमाला शहरातील १० प्रमुख आखाड़े उपस्थित असतात.  या अली जूना आखाडा, या अली नवीन आखाडा, गामा उस्ताद जूना आखाडा, गामा उस्ताद नवीन आखाडा ,  छत्रपति शिवाजी जूना आखाडा, छत्रपति शिवाजी नवीन आखाडा, माँ चंडिका आखाडा, जय वस्ताद बजरंग बली आखाडा वाही, जय दुर्गा आखाडा यांनी  आपल्या शस्त्रा सहित मॉ चंडिका प्रागणात उपस्थिती दर्शविली होती.   मनमोहक झाक्यांचे प्रदर्शन करण्यात आले. यात मंगळयान साकारणाऱ्या राजा पवणीच्या ग्रुपला प्रथम पारितोषिक, नवयुवक झाकी उत्सव मंडळ यांनी साकारलेल्या द्रौपदी चिरहरण या झाकीला दुसरे बक्षीस तर  प्रथमेश झाकी उत्सव मंडळ पद्मा वार्ड पवनी यांच्या अंधश्रद्धा बळी याला तिसरे बक्षीस देण्यात आले.  त्याचप्रमाणे अन्य झाकीच्या प्रदर्शनकर्त्याना प्रोत्साहन पार बक्षीस देण्यात आले.
 विजया दशमी निमित्य शस्त्र पुजेच्या कार्यक्रमाला उपस्थित आखाड्यांना मॉ चंडिका देवस्थान कमेटीच्या वतीने आखाडा वस्तादाचा शाल व श्रीफळ देवुन सत्कार करण्यात आला. 
  विजयादशमी उत्सव यशस्वी होण्याकरिता  माँ चंडिका देवस्थान पंच कमेटी कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले. ग्रामीण रुग्णालय पवनी येथील वैद्यकीय  पथक आपल्या टीम सहित मंदिर प्रागणात तत्पर होते.  सुरक्षा व्यवस्था पोलिस स्टेशन पवनी  ने चोख पार पाडली. 
प्रामुख्याने पोलिस उपविभागीय अधिकारी अश्विनी शेंडगे, पोलिस निरीक्षक यशवंत सोलसे , पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रशांत पिसे, न प उपाध्यक्ष कमलाकर रायपुरकर, युवाशक्ति अध्यक्ष देवराज बावनकर, पत्रकार अशोक पारधी, माज़ी नगराध्यक्ष रघुनाथ पिपरे,  चंडिका देवस्थान अध्यक्ष राजूभाई ठक्कर, सचिव देवाजी बावनकर व चंडिका देवस्थान सदस्य यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.   Print


News - Bhandara | Posted : 2019-10-10


Related Photos