येरवडा कारागृहात कैद्याची गळफास घेऊन आत्महत्या


 विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / पुणे : 
पुण्यातील येरवडा कारागृहात एका कैद्याने स्वतःला संपवल्याची घटना समोर आली आहे. त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सिद्धार्थ बापू कांबळे असे आत्महत्या केलेल्या कैद्याचे नाव आहे.
इंदापूर येथील एका गुन्ह्यात आरोपी सिद्धार्थ बापू कांबळे याला शिक्षा ठोठावण्यात आली होती. मागील काही महिन्यांपासून तो पुण्यातील येरवडा कारागृहात शिक्षा भोगत आहे. दरम्यान, मंगळवारी सकाळी त्याने टोकाचे पाऊल उचलत स्वतःला संपवले. कारागृहातील बराकीच्या बाहेरील बाजूस गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली, असे पोलिसांनी सांगितलं. सिद्धार्थ कांबळेच्या आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही. याप्रकरणी पोलीस तपास करीत आहे.  Print


News - Rajy | Posted : 2019-10-10


Related Photos